Guinness Record: गिनीज बुक रेकॉर्ड मोडण्यासाठी त्याने 33 सेकंदात खाल्ल्या जगातील सर्वात तिखट Carolina Reaper 10 मिरच्या (Watch Video)
Gregory Foster | (PC: You Tube)

जागतिक विक्रम (World Record) करण्याचे खूळ एकदा का डोक्यात बसले की त्यासाठी लोक काय करतील काहीच सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार पुढे आला आहे. केवळ गिनीस वर्ल्ड (GWR) बुक मध्ये असलेला विक्रम मोडून तो आपल्या नावे नोंदला जावा, यासाठी एका व्यक्तीने धक्कादायक कृत्य केले आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (GWR) च्या हवाल्याने आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, कॅलिफोर्नियाचे रहिवासी ग्रेगरी फॉस्टर(Gregory Foster) यांनी 17 सप्टेंबर रोजी एक विक्रम मोडला. त्यासाठी त्यांनी 8.15 सेकंदात कॅरोलिना रीपर (Carolina Reaper) प्रचातीच्या 10 मिरच्या खाल्या.

कॅरोलिना रीपर ही जगातील सर्वात तिखट मिरची म्हणून ओळखली जाते. उल्लेखनीय असे की, ग्रेगरी फॉस्टर यांनी स्वत:चाच विक्रम मोडला आहे. नऊ महिन्यांपूर्वी ग्रेगरी फॉस्टर यांनी 33.15 सेंकंदात 3 कॅरोलिना रीपर मिरच्या खान्याचा विक्रम केला होता. जो त्यांनी स्वत:च मोडला.

GWR ने सांगितले की, कॅरोलिना रीपर ही जगातील सर्वात तिखट म्हणून ओळखली जाणारी मिरची आहे. या मिरचीचा तिखटपणा मोजण्यासाठी अभ्यासक स्कॉविले हीट युनिट्स वापरतात. रासायनिक संयुगांची एकाग्रता निश्चित करून ही पद्धत पदार्थाची 'मसालेदारपणा' ठरवते. कॅरोलिना रीपर्स मिरचीची 1,641,183 स्कोविले हीट युनिट्स आहेत.

व्हिडिओ

दरम्यान, गिनीज बुकने दिलेल्या माहितीनुसार, फेलो अमेरिकन मिच डोनेली हा त्याचा स्पर्धक होता. त्याने एकदा मिस्टर फॉस्टरने आयोजित केलेली मिरची खाण्याची स्पर्धा जिंकली होती.