GRANDPA KITCHEN सर्वेसर्वा युट्युबर नारायण रेड्डी यांचे निधन
Grandpa Kitchen Servesarvh Narayana Reddy | (Photo Credits: Youtube)

Grandpa Kitchen सर्वेसर्वा नारायण रेड्डी उर्फ Grandpa of Grandpa Kitchen यांचे निधन झाले आहे. ते 74 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे आपल्या स्वादीष्ट चिकन रेसीपींनी युट्युब युजर्सना साद घालणारे Grandpa Kitchen यापुढे खवय्यांच्या मनात केवळ आठवण बनून राहणार आहे. रेड्डी यांनी आपल्या Grandpa Kitchen युट्युब चॅनलवरुन शेवटचा व्हिडिओ मृत्यूपूर्वी अवघ्या सहा दिवस आगोदर म्हणजेच 24 ऑक्टोबर 2019 या दिवशी प्रसारीत केला होता. हा व्हिडिओ लाईव्ह स्ट्रिमींग होता.

मुळचे तेलंगणा येथील असलेले नारायण रेड्डी यांना युट्युबच्या माध्यमातून जगभरात ओळख मिळाली. त्यांच्या चिकन आणि किचनमधील अनेक पदार्थ्यांच्या रेसीपीचे जगभरात फॅन आहेत. या आधी ते अनाथ मुलांसाठी जेवन बनवत असत. पुढे त्यांनी स्वत:चे युट्युब चॅनल सुरु केले. 26 ऑगस्ट 2017 ला सुरु झालेल्या या युट्युब चॅनलचे जगभरात 6 दशलक्षांपेक्षाही अधिक सबस्क्रायबर्स आहेत. तर आतापर्यं, 62,32,85,330 इतके या चॅनलला पेज व्हिव्ज मिळाले आहेत. बटर चिनक, फिश बिर्यानी, आणि बर्गर या त्यांच्या रेसीपी तरुणाईमध्ये भलत्याच लोकप्रिय होत्या. लहान मुलांसाठी त्यांनी विशेष रेसीपी बनवल्या. (हेही वाचा, Country Foods: ग्रामीण भागात पंचतारांकीत दर्जाचे अस्सल देशी पदार्थ बनवणाऱ्या युट्यूबर मस्तनम्मा यांचे निधन)

नारायण रेड्डी यांचा जिवनप्रवास युट्युब व्हिडिओ

कोणत्याही रेसीपीसाठी चित्रिकरण सुरु करताना नारायण रेड्डी हे प्रेम करा, काळजी घ्या आणि व्यक्त करा हा मंत्र उच्चारत. आपल्या व्हिडिओमध्ये मोजक्याच इंग्रजीचा वापर करत ते आपली रेसीपी शेअर करत असत. कोणताही पदार्थ बनवताना त्यांना पाहने ही त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणी असे. त्यांच्या निधनानंत जगभरातील त्यांच्या चाहत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.