वीगन डाएट (Vegan Diet) च्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही बाजारात वीगन फूड (Vegan Food) खरेदी करत असाल आणि ते नेमके कसे ओळखायचे याबाबत तुमच्या मनात संभ्रम असेल. तर, हा संभ्रम आता दूर होणार आहे. कारण भारतीय खाद्य सुरक्षा और मानक प्राधिकरण (FSSAI) ने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. एफएसएसएआय (FSSAI) ने वीगन फूडसाठी आता नवे बोधचिन्ह (LOGO) आणले आहे. हे बोधचिन्ह इंग्रजी वर्णमालेतील 'V' अक्षराने अथवा रोमन संख्येतील 'V' या अंकाने ओळखले जाणार आहे. हे बोधचिन्ह हिरव्या रंगात असणार आहे. त्यामुळे वीगन फूड ग्राहक आता केवळ लोगोवरुन ओळखू शकतात. केंद्र सरकार (Central Govt) ने शाकाहारी आहाराची एक रुपरेशा तयार केली आहे. त्याच्याशी संबंधीत काही नियमावलीही जाहीर केली आहे.
FSSAI ने पहिल्यांदा खाद्य उत्पादकांबाबत नियमांचा एक मसुदा तयार केला. ज्यात मंसाहारी आणि शाकाहारी आहारास अनुक्रमे लाल आणि हिरव्या रंगाच्या टिपक्यांनी चिन्हांकीत करण्यात आले. त्याच पद्धतीने आता वीगन फूड 'V' या बोधचिन्हाने ओळखले जाणार आहे. जेनेकरुन ग्राहकाला वीगन फूड पाहताक्षणी लक्षात येईल. खाद्यपदार्थांच्या पाकीटावर 'V' हे अक्षर हिरव्या रंगात पाहायला मिळाल्यास त्याचा अर्थ असा की तो पदार्थ वीगन फूड आहे. (हेही वाचा, टॉप 7 व्हेजीटेरियन डिश; ज्यामुळे नॉनव्हेजला कराल गुडबाय)
लोगो (LOGO) च्या वरच्या भागावर झाडाचे एक पान आहे. ज्यामुळे लक्षात येते की हे उत्पादन वनस्पतींपासून बनले आहे. त्याच्या खाली मोठ्या आकारात 'V' बनविण्यात आला आहे. जो (VEGAN) दर्शवते. शेवटी (VEGAN) हा शब्दही घेण्यात आला आहे. जेणेकरुन ग्राहकाने निशंशय माने आपल्या आवडीचे वीगन फूड निवडावे. लोगोचा थेट अर्थ आहे की, हा पदार्थ पूर्णपणे शाकाहारी आहे.