(Photo credits: Facebook)

आपल्यापैकी अनेक जण नॉनव्हेजीटेरियन असतील. ज्यांचे मांस, मासे आणि चिकन यांशिवाय पानही हालत नसेल. पण, आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत अशा ७ व्हेजीटेरियन पदार्थांबद्दल. जे टेस्ट करताच तुम्ही नॉनव्हेजला म्हणाल गुडबाय. कारण, आपल्यापैकी अनेक मंडळी केवळ मांस खाण्यासाठी नॉनव्हेज पदार्थ खात नाहीत. तर, ते केवळ जिभेचे चोचले पुरविण्यासाठी नॉनव्हेजला आपलेसे करतात. म्हणूनच जाणून घ्या नॉनव्हेजलाही फिके पाढतील असे रुचकर व्हेज पदार्थ.

छोले भटूरे

छोले भटूरे हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ. अर्थात हा पदार्थ गरम असतानाच खाल तितका छान. अन्यथा, त्यातील मजा गेलीच म्हणून समजा.

पाव भाजी

तुम्हाला जर बर्गर खाणे आवडत असेल तर, त्याचा अर्थ तुम्ही पाव भाजी टेस्टच केली नाही. एकदा पावभाजी टस्ट करून पाहा. तुम्ही पावभाजीचे फॅन व्हाल.

डोसा

डोसा हा एक असा भारतीय पदार्थ आहे. जो जगात प्रसिद्ध आहे. भारतीयांना तर हा पदार्थ इतका आवडतो की, केवळ दुकानावर इंडियन डोसा अशी पाटी वाचून लोक गर्दी करतात.

वडा सांभार

तुम्ही वडा पाव तर नेहमीच खात असाल. भारतात आणि त्यात करून मुंबई, महाराष्ट्रात हा पदार्थ अगदीच सर्वांच्या तोंडाशी असलेला. पण, तुम्ही एकदा वडा सांभार टेस्ट करा. मग जादू पाहा.

इडली

पचायला आणि बनवायला अतिशय सोपा असा हा पदार्थ. बहुतांश भारतीयांच्या सकाळच्या न्याहरीत हा पदार्थ हमखास आढळतो.

दम आलू आणि रुमाली रोटी

तुम्ही वरवर पाहाल तर हा एखादा नॉनव्हेज पदार्थ असल्यासारखे तुम्हाला वाटेल. पण, वास्तवत: हा व्हेज पदार्थ आहे. महाराष्ट्राबाहेर अनेक घरांमध्ये हा पदार्थ सण, समारंभ किंवा विशेष प्रसंगी करतो.

मिसळ पाव

हा पदार्थ तर तुम्ही टेस्ट केलाच असेल. त्यामुळे त्याच्या टेस्टबाबत फारसे न बोललेच बरे. नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटणारा हा पदार्थ. अर्थात, हा पदार्थ कसा बनवला जातो यावरही याची टेस्ट अवलंबून असते.