Dussehra Special Snacks Food: दसरा स्पेशल खाद्यपदार्थ, विजयादशमी बनवा अधिक स्वादिष्ट
Dussehra Secial Snacks Food | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

घटस्थापनेपासून नऊ दिवस हे विविध व्रतवैकल्यांचा काळ असतो. अनेक लोक या काळात उपवास करतात. नऊ दिवसांच्या नवरात्र उत्सवानंतर, आम्ही दहाव्या दिवशी दसरा साजरा करून उत्सवाची समाप्ती करतो. हा दिवस विजया दशमी म्हणूनही ओळखला जातो. या दिवशीही बहुतांश भारतीय सणांप्रमाणे अन्न (Dussehra Special Snacks Food) हा महत्त्वाचा घक असतो. आजच्या शुभ दिवशी आपण कोणत्या प्रकारचे अन्न पदार्थ खायला पाहिजेत. जे स्वादिष्ट  असतील? आपल्या या प्रश्नाच्या उत्तरासाठी आम्ही येथे काही पदार्थ देत आहोत. ज्यामुळे आपल्यालाही काहीशी कल्पना येऊ शकेल.

चिक्की -

दसरा सणानिमित्त चिक्की हा एक चांगला पर्याय आहे. चिक्की मग ती कशाचीही असो जसे की, शेंगदाणा, तीळ, राजगिरा, अंबा अथवा इतर कोणत्याही पदार्थाची असू शकते. चिक्की (शेंगदाणा) उपवासालाही चांगली असते. त्यात गुळाचे प्रमाण असल्याने एकाच वेळी तुम्हाला उर्जा आणि प्रथिने अशा दोन्ही गोष्टी मिळू शकतात. शेंगदाणा चिक्कीमध्ये शेंगदाणा, गुळ आणि तुप असते. (हेही वाचा, Dussehra 2022 Ravan Dahan: विजयादशमी निमित्त रावण दहन जरुर करा, तत्पूर्वी त्याचे प्रेरणादायी विचार नक्की जाणून घ्या)

पॉपकॉर्न

कमी वेळात तयार होणारा आणखी एक पदार्थ म्हणजे पॉपकॉर्न. अनेक भागांमध्ये रावण दहनाच्या वेळी ताजे पोप केलेले कॉर्नचे दाणे फराळ म्हणून दिले अथवा सेवन केले जातात. घरी पॉपकॉर्न तयार करणे खूप सोपे असते. या प्रसंगी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लेवर्ड पॉपकॉर्नचाही आस्वाद घेऊ शकता.

भजी

दसऱ्याच्या दिवशी स्वयंपाकात काही विशेष गोष्टींचा आंतर्भाव असतो. जेवणाच्या पानात विविध पदार्थ पाहायला मिळतात. अशा वेळी आपण आपल्या पानात भजीही घेऊ शकता. अर्थता भजी ही तळली जातात. त्यामुळे आपले आरोग्य विचारात घेऊनच भजांचे सवेन करावे. विशेष म्हणजे, बेसन, पनीर, मेथी आणि कारले अशा वेगवेगळ्या प्रकारची भजीही बनवता येतात.

समोसा/कचोरी

समोसा किंवा कचोरी हे दोन पदार्थ हे भारतीय अन्न पदार्थातील महत्त्वाचे मानले जातात. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मसालेदार, समोसा खरोखरच स्वादिष्ट पदार्थ असतो. परंतू, हा पदार्थही तेलात तळलेले असतात. त्यामुळे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेऊनच त्याचा अस्वाद घ्या. या पदारथांचा अस्वाद आपण पुदिना चटणी, केचप किंवा इमिली चटणीसोबत घेऊ शकता.

पुरणपोळी

पुरणपोळी हा खास महाराष्ट्र्रीय पदार्थ आहे. वरुण गव्हाची कणीक आणि आत पुरण अशी वैशिष्टपूर्ण पुरणपोळी खायला स्वादिष्ट लागते. महाराष्ट्राच्या घरोघरी सणानिमित्त हा खास पदार्थ बनवला जातो. प्रामुख्याने पुरणपोळी, गुळवणी, शेख आणि भात असा खास बेत प्रत्येक सणाला मराठी माणसाच्या घरी पाहायला मिळतो.