
International Yoga Day 2021 Wishes: योग म्हणजे जोडणे. शरीर, मन, बुद्धी यांना एकत्रित जोडणारं शास्त्र म्हणजे योग. भारताचं हे अत्यंत प्राचीन शास्त्र आता ग्लोबल झालं आहे. केवळ भारतीयांनाच नव्हे तर जगभरातील सर्वांनाच योगाचं महत्त्व पटलं आहे. त्यामुळेच आता जागतिक स्तरावर योग दिन साजरा होत आहे. 2015 पासून 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा होऊ लागला. त्यानंतर सातत्याने साजरा होणाऱ्या योगदिनाचे यंदा सातवे वर्ष आहे. योग दिनाला जगभरातून भरभरुन प्रतिसाद मिळत असून या दिवशी अनेक ठिकाणी एकत्रितपणे योगसाधना केली जाते.
योग दिनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Messages, Wishes, Quotes, Greetings आणि GIF's तुम्ही सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) वरुन शेअर करुन योगप्रेमींचा दिवस खास करा. (Happy Yoga Day 2021 Images: जागतिक योग दिनानिमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या योगाप्रेमींना शुभेच्छा!)
योग दिनाच्या शुभेच्छा!

निरोगी तन आणि शांत मनाची
गुरुकिल्ली म्हणजे ‘योग’
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

योग निसर्गाजवळ नेतो
योग ईश्वराची अनुभूती देतो
योग दिनाच्या आरोग्यदायी शुभेच्छा!

योग आहे आरोग्याची क्रांती,
नियमित योग केल्याने जीवनात येईल सुखशांती
योग दिनाच्या शुभेच्छा…!

नियमित करा योग
आयुष्यभर दूर ठेवा रोग
Happy International Yoga Day!

GIF's
कोविड-19 निर्बंधांमुळे यंदाचा योगदिन एकत्रितपणे साजरा करता येणार नसला तरी व्हर्च्युअल माध्यमातून तुम्ही योगसाधना करु शकता. कोरोनाच्या या कठीण आणि गंभीर काळात तणावमुक्त राहण्यासाठी योगसाधना नक्कीच फायदेशीर ठरेल.