Happy Yoga Day 2021 Images: जागतिक योग दिनानिमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या योगाप्रेमींना शुभेच्छा!

Happy Yoga Day 2021 HD Images:  सध्याच्या धावपळीच्या जीवनात बाकी सगळे मिळते, पण आपण स्वतःच्या शरीराकडे अर्थात आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करत आहोत. व्यायामाचे, योगाचे आपल्या आयुष्यात खूपच महत्त्व आहे.  दररोज नियमितपणे योगा केल्याने ताणतणावापासून दूर राहता येते. इवढेच नव्हे तर, माणसाचे वजन, हाडे, मांसपेशी आणि सांधेदेखील दणकट होतात. योगाचे आपल्या आयुष्यात खूपच महत्त्व आहे. अशा या खास दिवशी आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि जवळच्या  लोकांना योग दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी खालील एचडी इमेजस उपयोगी ठरणार आहेत.

जागतिक योग दिवस 21 जूनला जगभरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. जगभरात लोक हा दिवस साजरा करतात. भारतात योगाभ्यास करण्याची परंपरा सुमारे 5000 वर्ष जुनी आहे. योग हे शरीर आणि आत्मा यांच्यात सामंजस्याचे आश्चर्यकारक विज्ञान मानले जाते. या प्राचीन प्रथेविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. याची सुरुवात 2015 मध्ये झाली होती. हे देखील वाचा-

जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा-

जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा-

जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा-

जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा-

जागतिक योग दिनाचे औचित्य साधून जगभरात योगाअभ्यास आणि त्याचे फायद्यांचा प्रचार केला जातो. संयुक्त राष्ट्रात नरेंद्र मोदी यांनी योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर आता त्याचा प्रसार जगभरात झाला आहे. पाश्चात्य देशातही 'योगा स्टुडिओ'च्या माध्यमातून या शास्त्राचे प्रशिक्षण दिले जातात. बदलत्या जीवनशैलीप्रमाणे जसा भौतिक आयुष्यात तसे आजार बळावण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यावर मात करून निरोगी आयुष्य जगण्यासाठी आजपासूनच नियमित योगाभ्यास करायला सुरूवात करा.