
भारतातील स्कायगॅझर्ससाठी एक चांगली बातमी आहे. आज आकाशात ‘वर्म मून’ (Worm Moon 2023) पाहायला मिळणार आहे. हिवाळ्याच्या शेवटच्या पौर्णिमेला ‘वर्म मून’ म्हणतात. हिवाळ्यातील शेवटची पौर्णिमा 7 मार्च रोजी संध्याकाळी 6.10 वाजता होईल. ही हिवाळ्यातील तिसरी आणि शेवटची पौर्णिमा असेल. या पौर्णिमेला दिसणारा चंद्र मोठा आणि तेजस्वी दिसेल. खगोलशास्त्रज्ञ आज धुलीवंदनाच्या दिवशी, मंगळवारी संध्याकाळी ‘वर्म मून’ची घटना भारतात पाहू शकतात. वर्म मून हे मार्चमधील पौर्णिमेला दिलेले नाव आहे.
या काळात उत्तर अमेरिकेतील उष्ण प्रदेशात जमीन वितळण्यास सुरुवात होते आणि गांडुळे आणि इतर अनेक किडे (Worm) दिसायला लागतात, म्हणूनच कदाचित या पौर्णिमेला वर्म मून म्हणत असावेत. वर्म मून हे पारंपारिक नाव आहे, जे उत्तर अमेरिकन लोकांनी हिवाळ्यातील पौर्णिमेला दिले आहे. यानंतरच उन्हाळी हंगामाची औपचारिक सुरुवात मानली जाते. पंचांग म्हणते की, ऋतूंचा मागोवा घेण्यासाठी मूळ अमेरिकन लोकांनी चंद्रासाठी विविध नावे वापरली होती. मार्च महिन्याच्या पौर्णिमेला 'फुल वर्म मून'ला असे नाव देण्यात आले.
वर्म मूनचे महत्त्व अनेक कारणांमुळे आहे. ही पौर्णिमा उत्तर गोलार्धातील वसंत ऋतुची सुरुवात मानली जाते. एक प्रकारे, ही वेगवेगळ्या ऋतूंच्या चक्रीय स्वरूपाची सुरुवात मानली जाते. जगाच्या वेगवेगळ्या प्रदेशात त्याचे वेगळे महत्त्व आहे. वर्म मूनला युरोपमध्ये लेंटेन मून म्हणतात, ज्या दरम्यान इस्टरच्या आधी उपवासाचा कालावधी असतो. (हेही वाचा: शब-ए-बारात च्या शुभेच्छा Wishes, Messages च्या माध्यमातून शेअर करत साजरी करा Mid-Sha’ban!)
दरम्यान, चंद्र जेव्हा सूर्यापासून पृथ्वीच्या बरोबर विरुद्ध बाजूस असतो, तेव्हा दिसणाऱ्या चंद्राच्या कलेस पौर्णिमा असे म्हणतात. पौर्णिमेच्या वेळेला चंद्राचा पूर्ण प्रकाश पृथ्वीवर पोहोचतो. पौर्णिमेच्या रात्री चंद्राचे पूर्णबिंब सूर्यास्ताच्या वेळी पूर्व क्षितिजावर उगवते आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला मावळते. 6 मार्चला संध्याकाळी 6.17 नंतर पौर्णिमा तिथी सुरू झाली असून, 7 मार्च 2023 मंगळवार 06.09 पर्यंत ही तिथी राहणार आहे.