World Rose Day 2020 Wishes and Images Trend Online: जागतिक गुलाब दिनानिमित्त कॅन्सरग्रस्तांना संदेशामधून हे फुल पाठविणे याचा काय आहे संबंध? जाणून घ्या सविस्तर
World Rose Day (Photo Credits: Twitter)

जगभरात सर्वत्र 22 सप्टेंबर हा दिवस जागतिक गुलाब दिन (World Rose Day 2020) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी एकमेकांना संदेशाच्या माध्यमातून गुलाब दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात. मात्र याचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे या दिनाच्या दिवशी कॅन्सरग्रस्त (Cancer Patients) रुग्णांचे दु:ख कमी करण्यासाठी आणि त्यांना मानसिक आधार देण्यासाठीही दिवस साजरा केला जातो. यामुळे अनेक जण या दिवशी कॅन्सरग्रस्त रुग्णांना शुभेच्छा संदेश पाठवून किंवा गुलाब पाठवून जागतिक गुलाब दिनाच्या शुभेच्छा देतात. तसेच सोशल मिडियावर गुलाबाचे फुल पाठवून शुभेच्छा दिल्या जातात. यामुळे आज World Rose Day आणि Cancer दोन्ही टॅग्स सोशल मिडियावर ट्रेंड होताना दिसत आहे.

असे जरी असले तरी आपल्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडला असेल रोज डे आणि कॅन्सर यांचा नेमका काय संबंध? तर त्यामागचे कारणही तितके खास आणि हृदयाला स्पर्शून जाईल असे आहे.

हेदेखील वाचा- World Cancer Day 2020: 'जागतिक कर्करोग दिवस' निमित्त जाणून घ्या कर्करोगाचे विविध प्रकार आणि कारणे

'ही' आहे यामागची खरी कहाणी

1994 मध्ये कॅनडा मधील एका 12 वर्षाच्या मुलीला ब्लड कॅन्सर झाला होता. मेलंडा असे त्या मुलीचे नाव होते. त्यावेळी डॉक्टरांनी तिची अवस्था पाहता ती जास्तीत जास्त 2 आठवडे जगेल असे सांगितले होते. मात्र मेलंडाची इच्छाशक्ती फार प्रबळ होती आणि या इच्छाशक्तीच्या जोरावर डॉक्टरांचा हा अंदाज खोटा ठरवत पुढील 6 महिने कॅन्सरवर मात केली. तिचा हा लढा डॉक्टरांसाठी जितका धक्कादायक होता तितकाच तो सा-या जनतेला प्रेरणादायी होती. म्हणूनच या मुलीच्या आढवणीत हा दिवस साजरा केला होता.

म्हणूनच हा दिवस मेलंडाच्या आठवणीत साजरा केला जात असून या दिवशी कर्करोगाशी झुंज देणा-या रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी साजरा केला जातो. चिमुकल्या मेलंडाचा लढा फार प्रेरणादायी होता. त्यामुळे तिच्या या लध्याला सलाम करत हा दिवस साजरा केला जातो.