World Post Day 2020 Greetings: जागतिक टपाल दिन निमित्त नेटकर्‍यांच्या खास शुभेच्छा, UN सह मान्यवरांनी Corona Pandemic काळात पोस्टाने दिलेल्या सेवेबद्दल मानले आभार
World Post Day (Photo Credits: File Image)

जगभरामध्ये 9 ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिन (World Post Day) म्हणून साजरा केला जातो. यंदा या टपाल दिवसाचं महत्त्व अधिक कारण मागील 6-7 महिन्यांपासून कोरोना व्हायरसमुळे फैलावलेल्या कोविड 19 या जागतिक आरोग्य संकटाच्या काळात पोस्ट विभागाने देखील महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. आता इंटरनेटचा जमाना आहे त्यामुळे पत्र व्यवहार, तार या सेवा मागे पडल्या आहेत मात्र आजही जगभरात वस्तू पाठवण्यासाठी टपाल सेवा, पोस्ट ऑफिस काम करत आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये अवघं जग ठप्प पडलं होतं तेव्हा अनेक गोष्टी जगभरात सुरक्षितपणे पोहचवण्यासाठी टपाल विभाग काम करत होते. यामध्ये औषधांपासून ते अगदी फळांचा राजा आंब्याच्या देवाण-घेवाणीमध्येही टपाल विभागाचा मोलाचा वाटा होता.

यंदा टपाल दिनाच्या निमित्ताने आमदार रोहित पवार, UN Secretary-General ते अगदी सामान्य नेटकर्‍यांनी कोरोना संकटकाळातील त्यांच्या सेवेबद्दल आभार मानले आहेत. त्यानिमित्त अनेक ग्रिटिंग्स, मेसेजेस, इमेजेस शेअर करण्यात आले आहेत. Maharashtra Government Jobs 2020: महाराष्ट्रात पोस्ट ऑफिस विभागात नोकरीची संधी, येथे जाणून घ्या अर्ज प्रक्रियेसह महत्वाच्या गोष्टी.

टपाल दिन 2020 निमित्ताने शुभेच्छा !

UN Secretary-General चा मेसेज

आमदार रोहित पवार

रवी शंकर प्रसाद

चंद्रकांत पाटील

युनिव्हर्सल पोस्टल युनियन ची उभारणी 1874 साली स्विझर्लंडची राजधानी बर्न येथे झाली होती. तेथे 22 देशांनी करारावर स्वाक्षरी केल्या होत्या. टोकियोमध्ये 1969 साली आयोजित संमेलनामध्ये 9 ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा करण्याबाबत घोषणा करण्यात आली. तेव्हापासून टपाल विभागामध्ये असलेल्या सेवा आणि विभागाची माहिती देण्यासाठी जागतिक टपाल दिन साजरा केला जातो.