Business opportunity with Post Office | (Photo credit: archived, edited, representative image)

Maharashtra Government Jobs 2020:  भारतीय पोस्ट विभागाकडून (Indian Post Office) नोकर भरतीसाठी घोषणा करण्यात आली आहे. ही नोकरभरती महाराष्ट्र (Maharashtra) विभागासाठी असून पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफसाठी होणार आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिसात काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ही उत्तम संधी असून त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. येत्या 5 ऑक्टोंबर पासून 10.00 वाजता ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. तसेच 3 नोव्हेंबर रोजी रात्री 23.59 मिनिटांनी अर्ज प्रक्रियेची अंतिम मुदत असणार आहे.

पोस्ट ऑफिसात नोकर भरतीदरम्यान काही पदांसाठी उमेदवारांची निवड विभागीय परीक्षा आणि पदोन्नतीद्वारे भरल्या जाणार आहेत. पोस्टमन आणि मेल गार्डसाठी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18-27 वर्ष वयोगटातील असावे. तर मल्टी टास्किंग स्टाफ पोस्टसाठी वयाची अट 18-25 वर्ष आहे. वयोमर्यादा निश्चित करण्याची तारीख 3 नोव्हेंबर पर्यंत आहे.(Nagpur University's Online Exams Postponed: शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलल्या)

पोस्टमन आणि मेल गार्ड पदासाठी उमेदवाराने 12 वी पास आणि मल्टी टास्किं स्टाफ पदासाठी कमीतकमी 10 वी पास असणे अनिवार्य आहे. या दोन्ही पदांसाठी निवडण्यात येणाऱ्या उमेदवारांनी महाराष्ट्र राज्यातून अभ्यास पूर्ण आणि 10 वी पर्यंत मराठी भाषेतून शिक्षण पूर्ण केलेले असावे. तसेच गोवा राज्यातील उमेदवारांनी कोंकणी आणि मराठीतून 10 वी पर्यंत शिक्षण पूर्ण असावे.(Revised Schedule of CET 2020 Exams: हॉटेल मॅनेजमेंट, कंप्यूटर अ‍ॅप्लिकेशनच्या अभ्यासक्रमांच्या यंदाच्या सीईटी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जारी; mahacet.org वर पहा नव्या तारखा)

उमेदवारांची निवड कंप्युटरच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामध्ये स्थानिक भाषा आणि डेटा एन्ट्री संबंधित चाचणी घेण्यात येणार आहे. परीक्षेचा पॅटर्न पहाण्यासाठी येथे क्लिक करा.

पोस्टमन पदासाठी निवडण्यात आलेल्या उमेदवाराने नियुक्ती तारखेपासून दोन वर्षाच्या आतमध्ये दुचाकी किंवा तीन चाकी वाहनाचा परवाना घ्यावा लागणार आहे. तसेच अपंग व्यक्तिंना वाहन परवानासाठी सूट दिली जाणार आहे.