Revised Schedule of CET 2020 Exams: हॉटेल मॅनेजमेंट, कंप्यूटर अ‍ॅप्लिकेशनच्या अभ्यासक्रमांच्या यंदाच्या सीईटी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जारी; mahacet.org वर पहा नव्या तारखा
Online | Photo Credits: Pixabay.com

मागील सहा महिन्यांपासून घोंघावणार्‍या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षाचं गणित बिघडलं आहे. दरम्यान यंदा पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबर महिन्यात होणार असल्याने हॉटेल मॅनेजमेंट आणि कंप्यूटर अ‍ॅप्लिकेशन सह पदवीच्या आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. महाराष्ट्र सीईटीकडून 12 सीईटी परीक्षांसाठी (CET Exams 2020) सुधारित वेळापत्रक  mahacet.org याा अधिकृत संकेतस्थळावर जारी केले आहे. दरम्यान ऑक्टोबर महिन्यात राज्यभर विद्यापीठांकडून ऑनलाईन अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे अंतिम वर्षाची परीक्षा आणि सीईटी परीक्षा एकत्र येऊ नयेत म्हणून त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. इथे पहा सविस्तर वेळापत्रक.

सुधारित वेळापत्रकानुसार, आता MAH-M.Arch-CET-2020 परीक्षा 27 ऑक्टोबर दिवशी, MAH-M.HMCT-CET-2020 27 ऑक्टोबर दिवशी, MAH-MCA-CET-2020 28 ऑक्टोबर दिवशी तर MAH-B.HMCT-CET-2020 10 ऑक्टोबर दिवशी होणार आहे. यासोबतच एलएलबी, बीएडच्या सीईटी परिईक्षांचे वेळापत्रक देखील नव्याने जाहीर झाले आहे.  लवकरच या परीक्षांच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट जारी केले जाईल. त्यावर परीक्षा केंद्र, परीक्षेची वेळ, पत्ता नमूद असेल.  MAH CET 2020 Admit Cards: यंदा PCM, PCB ग्रुपच्या सीईटी परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांची हॉल तिकीट जारी; mhtcet2020.mahaonline.gov.in वरून असं करा डाऊनलोड.  

दरम्यान विद्यार्थ्यांना यंदा कोरोनाच्या सावटाखाली परीक्षा द्यावी लगणार असल्याने त्यासाठी विशेष नियमावली असेल. त्याचं काटेकोर पालन करणं बंधनकारक असेल. तसेच परीक्षा केंद्रावर पोहचताना ओळखपत्र, मूळ हॉल तिकीट घेऊन येणं बंधनकारक आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनेकदा सीईटी परीक्षांचे वेळापत्रक यापूर्वी बदलण्यात आले आहे. काहींनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेत यंदा परीक्षा रद्द करण्याची देखील मागणी केली होती. मात्र ती कोर्टाने फेटाळली आहे. यंदा कोरोना संकटामध्येच जीईई मेन्स, अ‍ॅडव्हान्स, नीट परीक्षा 2020 पार पडल्या आहेत. काल सर्वोच्च न्यायालयात यंदाच्या युपीएससी परीक्षा देखील पुढे ढकलल्या जाऊ शकत नसल्याचं सांगण्यात आलं आहे.