महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संकटाच्या सावटाखाली सीईटीच्या (CET) यंदाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्यानंतर आता राज्यात यंदा अभियांत्रिकी, फार्मसीच्या पदवीच्या प्रवेशासाठी आवश्यक महाराष्ट्र सीईटी परीक्षा 2020 साठी हॉलतिकीट्स जारी करण्यात आली आहेत. PCM आणि PCB ग्रुप साठी वेगवेगळी जारी करण्यात आलेली हॉलतिकीट्स विद्यार्थ्यांना mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहेत. यंदा 1 ते 9 ऑक्टोबर पीसीबी ग्रुप (PCB Group) म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या ग्रुपची सीईटी परीक्षा पार पडणार आहे. त्यासाठी 1,2 आणि 4 ते 9 ऑक्टोबर दरम्यान परीक्षा होतील. तर पीसीएम (PCM Group) म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या ग्रुपची सीईटी 12 ते 16 आणि 19 , 20 ऑक्टोबर दिवशी होईल. मात्र या परिक्षांसाठी हॉलतिकीट्स बंधनकारक आहेत. त्याशिवाय परीक्षा केंद्रावर परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे ही हॉलतिकीट्स ऑनलाईन mahacet.org वरून डाऊनलोड कशी कराल? हे नक्की जाणून घ्या. इथे पहा सूचनापत्र .
MAH CET 2020 Admit Cards ही PCM,PCB ग्रुप साठी कशी डाऊनलोड कराल?
- mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- होम पेजवर candidate’s login section निवडा.
- तुमच्या लॉगिनसाठी विचारलेली आवश्यक माहिती भरा. आणि proceed वर क्लिक करा.
- “Download hall tickets” हा पर्याय तुमच्यासमोर दिसेल.
- विषयांमध्ये PCB,PCM ग्रुप निवडा आणि सर्च वर क्लिक करा.
- तुमच्या विषयांच्या ग्रुप नुसार अॅडमीट कार्ड समोर येतील.
- स्क्रिनवरील अॅडमीट कार्ड तुम्ही डाऊनलोड देखील करू शकता.
MAH CET 2020 Admit Cards या डिरेक्ट लिंकवरून देखील डाउनलोड करता येऊ शकतात.
MHT-CET ही परीक्षा दरवर्षी महाराष्ट्र सरकार कडून घेतली जाते. त्यासाठी Directorate of Technical Education विभाग परीक्षांचे नियोजन करते. या परीक्षांच्या निकालावरून अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनियरिंग आणि फार्मसी सारख्या महत्त्वाच्या शाखांमधील पदवीचे प्रवेश राज्यभर दिले जातात. या परीक्षेला सामोरं जाताना विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेचं हॉलतिकीट सादर करणं आवश्यक आहे. या ऑनलाईन हॉलतिकीटावर परीक्षेची तारीख, वेळ, परीक्षा केंद्र, पत्ता यासोबतच विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत अअणि वैयक्तिक माहितीचे तपशील दिले जातात. यंदा त्यावर कोविड 19 च्या अनुषंगाने आवश्यक गाईडलाईन्स देखील दिलेल्या आहेत.
MHT CET 2020 परीक्षेसाठी यंदा महाराष्ट्रातून सुमारे 5.3 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे. त्यामध्ये पीसीबी साठी 2.8 लाख तर पीसीएम साठी 2.5 लाख विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन नोंदवण्यात आले आहे.