World Milk Day 2023 Wishes: आरोग्यासाठी दुधाचे महत्त्व आणि आपल्या दैनंदिन आहारात ते किती महत्त्वाचे आहे याची जाणीव करून देण्यासाठी जागतिक दूध दिन दरवर्षी 1 जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचे कारण म्हणजे जगभरात दुधाला जागतिक अन्न म्हणून मान्यता देणे. दरम्यान, आजही बहुतांश लोकांना असे वाटते की दूध हे फक्त मुलांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे, तर हे पूर्ण अन्न असुन प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. दुध दिनाच्या दिवशी लोकांना दुधाचे आरोग्यदायी फायदे सांगितले जातात आणि त्यांना त्यांच्या दैनंदिन आहारात दुधाचा समावेश करण्यास प्रवृत्त केले जाते. यासोबतच दुग्धव्यवसाय किंवा दूध उत्पादन क्षेत्रात स्थिरता, उपजीविका आणि आर्थिक विकासाला चालना देणे हे देखील त्याचे उद्दिष्ट आहे. जागतिक दूध दिन म्हणजेच जागतिक दूध दिनाची सुरुवात संयुक्त राष्ट्रांनी 2001 साली केली.
जागतिक दूध दिनाचे खास संदेश
जागतिक दुध दिन साजरा करण्याचे श्रेय संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेला जाते. या खास प्रसंगी, तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना या दुध दिनाच्या शुभेच्छा, व्हॉट्सअॅप स्टिकर्स, फेसबुक संदेश, कोट्स आणि GIF प्रतिमा पाठवून शुभेच्छा देऊ शकता.