World Hindi Day 2021 Image: हिंदी ही भारताची राष्ट्रीय भाषा आहे. दरवर्षी 10 जानेवारी हा दिवस 'जागतिक हिंदी दिन' म्हणून साजरा केला जातो. आंतराष्ट्रीय पातळीवर हिंदी भाषेचा प्रचार-प्रसार व्हावा हा यामागचा उद्देश आहे. जागतिक हिंदी दिनानिमित्त जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जागतिक हिंदी परिषदेचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1975 मध्ये केले होते. जगभरात हिंदी चा प्रचार-प्रसार करण्यासाठी नागपुरात पहिली जागतिक हिंदी परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत 30 देशांतील 122 प्रतिनिधी उपस्थित होते. 2006 सालापासून दरवर्षी 10 जानेवारी रोजी जागतिक हिंदी दिन साजरा केला जातो. 'जागतिक हिंदी दिवस' निमित्त तुम्ही आपल्या हिंदी भाषिक मित्र-मैत्रिणींना मराठी शुभेच्छा Messages, Wishes, Greetings, WhatsApp Stickers च्या माध्यमातून शेअर करून खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्हाला खालील शुभेच्छापत्र नक्की उपयोगात येतील. (वाचा - World Hindi Day 2021: जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जाणार? जाणून घ्या त्यामागील इतिहास आणि महत्व)
जागतिक हिंदी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जागतिक हिंदी दिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
जागतिक हिंदी दिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !
जागतिक हिंदी दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा!
सर्व हिंदी भाषिकांना जागतिक हिंदी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
परदेशात भारतीय राजदूत हा दिवस विशेषपणे साजरा करतात. या दिवशी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये विविध विषयांवर हिंदीसाठी खास कार्यक्रम आयोजित केले जातात. 1975 पासून भारत, मॉरिशस, युनायटेड किंगडम, त्रिनिदाद आणि टोबॅगो, युनायटेड स्टेट्स सारख्या विविध देशांमध्ये जागतिक हिंदी परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे. 10 जानेवारी 2006 रोजी प्रथमचं जागतिक हिंदी दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर दरवर्षी 10 जानेवारी रोजी जागतिक हिंदी दिवस साजरा करण्यात येतो.