Women's Day 2020 Marathi Message: जगभरातील प्रत्येक महिलेसाठी 8 मार्च हा दिवस खास आहे. यंदा आंतरराष्ट्रीय महिला दिन 'I am Generation Equality: Realising Women's Rights'या थीमवर साजरा केला जाणार आहे. या दिवशी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक महिलेचं स्थान खास करण्यासाठी तिला सोशल मीडीयामध्ये व्हॉट्सअॅप, Facebook स्टेट्स, मेसेजच्या माध्यमातून खास शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्र, मेसेज देऊन त्यांचा आजचा दिवस खास करा. दरम्यान महिला दिनाचं औचित्य साधून जगभरात महिलांसाठी खास कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. स्त्री ही क्षणाची पत्नी असून अनंत काळाची माता असते. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर स्त्रीच्या आयुष्यात बदल होत असतात. आणि जगभरातील या सार्यांवर मात करून आपलं शिक्षण, करियर, घर, कुटुंब आणि संस्कार सांभाळतात. अनेक समाजांमध्ये महिलेकडे अबला म्हणून पाहिलं जातं. परंतू तिच्यामधील सामर्थ्याची जर तिला जाणीव करून दिली तर महिलांसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. मग तुमच्या अवतीभवती असणार्या अशाच काही महिलांना यंदाच्या महिला दिनाच्या शुभेच्छा Wishes, Greetings, SMS, GIFs, Messages and Hike Stickers च्या माध्यमातून देण्यासाठी हे खास मेसेज नक्की शेअर करा. International Women's Day 2020: यंदाचा आंतररष्ट्रीय महिला दिन जाणून घ्या कोणत्या थीम वर जगभर साजरा केला जाणार.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी मेसेज
व्हॉट्सअॅप फॉर्वर्ड मेसेज-
उत्तुंग तुझ्या भरारी पुढे
गगन हे ठेंगणे भासावे
तुझ्या विशाल पंखाखाली
अवघे विश्व वसावे
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
व्हॉट्सअॅप फॉर्वर्ड मेसेज-
स्मरण त्यागाचे
स्मरण शौर्याचे
स्मरण कर्तृत्त्वाचे
स्मरण स्त्री पर्वाचे
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
व्हॉट्सअॅप फॉर्वर्ड मेसेज-
विधात्याच्या नवनिर्माणाची कलाकृती तू
एक दिवस साजरा कर स्वतःच्या अस्तित्वाचा तू
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
व्हॉट्सअॅप फॉर्वर्ड मेसेज-
प्रतिभेला तुझ्या नवे पंख मिळू दे
स्वप्नांना तुझ्या नवी क्षितिजं लाभू दे
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
व्हॉट्सअॅप फॉर्वर्ड मेसेज-
आमच्या 'वाघा'सारख्या मित्रांना
'मांजर' बनवणार्या तमाम वहिनीसाहेबांना
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
व्हॉट्सअॅप फॉर्वर्ड मेसेज-
आईच्या वात्सल्याला सलाम
बहिणीच्या प्रेमाला सलाम
मैत्रिणीच्या विश्वासाला सलाम
पत्नीच्या खंबीर पाठिंब्याला सलाम
माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री शक्तीला सलाम
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
महिला दिनाच्या शुभेच्छा व्हॉट्सअॅप स्टिकर्सच्या माध्यमातून कशा द्याल?
व्हॉट्सअॅप हे लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. आता सणांच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हॉट्सअॅपवर खास स्टिकर्स उपलब्ध आहेत. आता यामध्ये मराठमोळे स्टिकर्सदेखील उपलब्ध आहेत. तुमच्या स्मार्टफोनमध्ये महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळे व्हॉट्सअॅप स्टिकर्स डाऊनलोड करण्यासाठी गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Women's Day Stickers असं टाईप करा. त्यानंतर तुमच्या आवडीचा स्टिकर्सचा अपॅक डाऊनलोड करा आणि त्यानंतर तुम्ही व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शुभेच्छा देऊ शकता.
महिला दिनी जांभळा रंगाचं महत्त्व केवळ तो एक सुंदर रंग आहे म्हणून नव्हे तर त्यासोबत इतिहास देखील आहे. लिंग समानता म्हणजेच Gender Equality चं प्रतिक म्हणून या रंगाकडे पाहिलं जातं. 'जांभळा' रंग 'स्त्रियांनी मिळवलेलं यश' किंवा आगामी काळात त्या ज्या यशाला गवसणी घालू इच्छित आहेत त्यांचं प्रतिक आहे. आम्हा लेटेस्टली मराठी कडून सार्या महिला वाचकांना यंदाच्या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!