
Swaminarayan Jayanti 2025 HD Images: स्वामीनारायण जयंती (Swaminarayan Jayanti 2025) ही हिंदू धर्माचे मुख्य संत आणि देव मानले जाणारे श्री स्वामीनारायण जी यांची जयंती म्हणून साजरी केली जाते. हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला येतो. या दिवशी रामनवमी देखील साजरी केली जाते. भगवान स्वामीनारायण यांचा जन्म उत्तर प्रदेशातील छपैया गावात झाला. मान्यतेनुसार, त्यांना भगवान विष्णूचा अवतार देखील मानले जाते. लहानपणापासूनच त्याने आश्चर्यकारक आणि अलौकिक चमत्कार दाखवले होते.
कठोर तपश्चर्या आणि ध्यान केल्यानंतर, त्यांनी संपूर्ण भारतभर प्रवास केला आणि शेवटी गुजरातमध्ये कायमचे धर्मप्रचार सुरू केला. भगवान स्वामीनारायण यांनी समाजात प्रचलित असलेल्या जातीयता, अंधश्रद्धा आणि असमानता यांसारख्या वाईट गोष्टींविरुद्ध आवाज उठवला. स्वामीनारायण जयंतीच्या दिवशी, भाविक उपवास करतात आणि विशेष पूजा, आरती, कीर्तन आणि सत्संग आयोजित करतात. देशभरात भगवान स्वामीनारायणांना समर्पित अनेक मंदिरे आहेत. आज स्वामीनारायण जयंतीनिमित्त तुम्ही खाली ईमेज शेअर करून स्वामीनारायण जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता.
स्वामीनारायण जयंतीच्या शुभेच्छा!

स्वामीनारायण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वामीनारायण जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
स्वामीनारायण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वामीनारायण जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला स्वामीनारायण जयंती साजरी केली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, 2025 मध्ये, हा सण 06 एप्रिल, रविवारी साजरा केला जाईल. या दिवशी देशभरात रामनवमी साजरी केली जाईल.