Marathi Bhasha Din 2025 Messages In Marathi 6 (फोटो सौजन्य - File Image)

Marathi Bhasha Din 2025 Messages In Marathi: महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आपल्या मराठी भाषेचा अभिमान आहे. दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. ज्याला मराठी भाषा दिन (Marathi Bhasha Din 2025) म्हणूनही ओळखले जाते. हा दिवस केवळ भाषेची ओळख पटवण्याचा नाही तर तिचा समृद्ध इतिहास, साहित्यिक वारसा आणि सांस्कृतिक महत्त्व साजरे करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

मराठी भाषा दिन मराठी भाषेच्या सौंदर्याची, समृद्ध आणि इतिहासाची ओळख करून देण्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी साहित्यिक दिग्गज कुसुमाग्रज यांचा जन्मदिन साजरा केला जातो. मराठी भाषेचा गौरव वाढवण्यात कुसुमाग्रजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आज आम्ही तुमच्यासाठी मराठी भाषा दिनानिमित्त Wishes, Quotes, Greetings घेऊन आलो आहोत. तुम्ही ते सोशल मीडियाद्वारे आपल्या प्रियजनांना पाठवून मराठी भाषा दिनाच्या खास मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता.

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा - 

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

सर्व मराठी बांधवांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Marathi Bhasha Din 2025 Messages In Marathi 1 (फोटो सौजन्य - File Image)

माय मराठी!

तुझ्यासाठी वात होऊनी जळते मी,

क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी.

जय महाराष्ट्र जय मराठी जय शिवराय

सर्व मराठी बांधवांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Marathi Bhasha Din 2025 Messages In Marathi 2 (फोटो सौजन्य - File Image)

मराठी आमची बोली, अथांग तिची खोली

काय वर्णू तिची गोडी, अमृतासमान,

नव्या रक्ताला देऊन अनुभवाची जोड

जगात नसेल माझ्या मराठीला तोड

आज सर्वासंगे चालतेय प्रगतीची वाट

उद्या सूर्य उगवेल घेऊन नव्या जगाची पहाट

मराठी बांधवांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Marathi Bhasha Din 2025 Messages In Marathi 3 (फोटो सौजन्य - File Image)

माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा

हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यातील शिळा

मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Marathi Bhasha Din 2025 Messages In Marathi 4 (फोटो सौजन्य - File Image)

भाषेचा गोडवा साखरेहूनी फार,

मऊ मखमली असली तरी

शब्दांना तिच्या धार,

वळवावी तशी वळते

सहज सगळ्यांना कळते.

भाषेची आमच्या श्रीमंती अपरंपार

मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Marathi Bhasha Din 2025 Messages In Marathi 5 (फोटो सौजन्य - File Image)

मराठी भाषा दिनाच्या दिवशी मराठी संस्कृती आणि वारशाबद्दल जागरूकता निर्माण केली जाते. जगभरातील मराठी भाषिक समुदायांमध्ये हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस लोकांना, विशेषतः तरुण पिढीला, त्यांच्या दैनंदिन जीवनात मराठी भाषा शिकण्यास, तिचे कौतुक करण्यास आणि वापरण्यास प्रोत्साहित करतो.