Happy Shravan Maas 2023 Messages: भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्वात मोठ्या सणांमध्ये श्रावन सोमवार खूप खास आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवभक्त श्रावन महिन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या वर्षी श्रावन महिना 18 जुलैपासून सुरू होत आहे आणि सावनचा पहिला सोमवार 24 जुलैला आहे. या दिवशी लोक उपवास करतात आणि शिवलिंगावर दूध, दही, मध घालून शिवलिंगाला अभिषेक करतात. तसेच भगवान शिवाला बेलपत्र, फळे, फुले इत्यादी अर्पण करतात.
याशिवाय श्रावण सुरू होतात सोशल मीडियावर श्रावण मांसारंभाच्या शुभेच्छा देण्याचीही पद्धत आहे. श्रावणमासारंभ निमित्त Wishes, Whatsapp Status, HD Images, Quotes, Greetings, SMS द्वारे तुम्ही आपल्या मित्र-परिवारास खास शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा -Shravan Month 2023 in Maharashtra: यंदा 59 दिवसांचा श्रावण मास; जाणून घ्या श्रावण आणि अधिक श्रावण मासाच्या महाराष्ट्रातील तारखा काय?)
निसर्ग आलाय बहरून, मनही आलंय मोहरून
रंगात तुझ्या नहाण्या, मन होई पाखरू पाखरू
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आनंद माझ्या मनात माईना, सृष्टी सजली बदलली दृष्टी
घेऊन सरींवर सरी आला तो माझ्या अंगणी
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!
श्रावण मासाला झाला प्रारंभ
करू शिवाच्या पूजेला आरंभ
ठेऊ शिवाचे व्रत
होईल श्रावणी सोमवार सुफळ संपूर्ण
श्रावण महिन्याच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
ॐ नमः शिवाय
शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव अनंत आहे,
शिव ब्रम्ह आहे, शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे,
श्रावण मासच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!
निसर्ग बहरलाय, गारव्याने देहही शहारलाय
मनही थोड मोहरून घ्या, आलाय श्रावण भिजून घ्या।
सुरू होणारा हा श्रावण तुमच्या मनाला सुख,
शांती आणि समाधान लाभणारा ठरू दे हीच सदिच्छा!
श्रावण महिन्याच्या मंगलमय शुभेच्छा!
श्रावण महिना सुरू झाला की, सर्वत्र निसर्ग हिरवी चादर ओढतो. या महिन्यात निसर्गाचं रुप पाहण्यासारखं असतं. श्रावण महिन्यात, भक्त भगवान शिवाची विशेष प्रार्थना करतात. श्रावण महिना हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिना मानला जातो. यावेळी शिवभक्त त्याची पूजा करतात. ते भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी उपवास देखील करतात. श्रावणात सोमवारचेही विशेष महत्त्व असून या दिवसांत भगवान शंकराच्या मंदिरात भाविकांची गर्दी असते.