
Eid Milad-un-Nabi 2022 Messages: यावर्षी 9 ऑक्टोबर 2022 रोजी ईद मिलाद उन-नबीचा उत्सव साजरा होणार आहे. भारतातील सर्व मुस्लिम बांधव हा सण मोठ्या उत्साहात आणि पूर्ण उत्साहाने साजरा करतात. या सणाला ईद-ए-मिलाद किंवा बारवफत असेही म्हणतात. 12 रबी-उल-अव्वल तारखेला होणारा हा सण मुस्लिम समाजासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. ईद-ए-मिलाद म्हणजेच ईद मिलाद उन नबी हा प्रेषित मुहम्मद यांच्या जन्माच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. हा दिवस पूर्णपणे पैगंबर मुहम्मद आणि त्यांच्या शिकवणींना समर्पित आहे. हजरत मुहम्मद हे इस्लामचे शेवटचे पैगंबर मानले जातात.
या दिवशी मुस्लिम बांधव नमाज अदा करतात आणि शहरातील प्रमुख भागात मिरवणूक काढतात. याशिवाय मोहम्मद साहेबांनी दिलेले शिक्षण ते पाळतात. या दिवशी लोक WhatsApp Stickers, Facebook Greetings, Quotes, Images पाठवून एकमेकांना या खास दिवसाचे शुभेच्छापत्र शेअर करतात. या संदेशांद्वारे तुम्ही तुमचे मित्र आणि नातेवाईक यांचेही अभिनंदन करू शकता. खाली Eid Milad-un-Nabi निमित्त काही खास शुभेच्छापत्र देण्यात आली आहेत. तुम्ही हे शुभेच्छापत्र डाऊनलोड करून तुम्ही आपल्या मित्र-परिवारास शुभेच्छा देऊ शकता.
जिन्दगी का हर पल खुशियों से कम न हो
आप का हर दिन ईद से कम न हो
ऐसा ईद का दिन आपको नसीब हो
ईद ए मिलाद उन नबी की मुबारकबाद हो

मुबारक मौका अल्लाह ने अता फरमाया,
एक बार फिर बंदगी की राह पर चलाया,
अदा करना अपना फर्ज़ खुदा के लिए,
खुशी से भरी हो मिलाद-उन-नबी आपके लिए
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक !

दिए जलते और जगमगाते रहे
हम आपको इसी तरह याद आते रहे
जब तक जिंदगी है ये दुआ हैं हमारी
आप चाँद की तरह जगमगाते रहें
Happy Eid Milad-Un-Nabi 2022

सोचा किसी अपने से बात करूं,
अपने किसी ख़ास को याद करूं,
किया जो फैसला ईद मुबारक कहने का,
दिल ने कहा क्यूँ न आपसे शुरुवात करूं
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक !

अल्लाह आपको ईद-ए-मिलाद-उन-नबी के
मुक्कदस मोके पर तमाम
खुशियां अता फरमाएं और आपकी इबादत कबूल करें
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक !

मदीने में ऐसी फ़िज़ा लग रही है,
की जन्नत की जैसी हवा लग रही है,
मदीने पहुँच कर जमीन को जो देखा,
यह जन्नत का जैसे पता लग रही है,
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक !

प्रेषित मुहम्मद यांचा जन्म इस्लामिक चंद्र दिनदर्शिकेतील तिसरा महिना रबी-अल-अव्वालच्या 12 तारखेला झाला. यामुळेच मुस्लिम प्रेषित मुहम्मद यांचा जन्मदिवस हा मिलाद-उन-नबीचा सण म्हणून साजरा करतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिया मुस्लिम लोक ईद-ए-मिलाद हा सण रबी-अल-अव्वालच्या 17 व्या दिवशी साजरा करतात आणि सुन्नी मुस्लिम 12 व्या दिवशी हा सण साजरा करतात.