
Lalita Panchami 2024 HD Images: शारदीय नवरात्री (Sharadiya Navratri 2024) च्या पाचव्या दिवशी म्हणजे अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमी (Lalita Panchami 2024) व्रत पाळले जाते. या दिवशी स्कंदमातेची पूजा करण्याचीही प्रथा आहे. यंदा 7 ऑक्टोबर रोजी ललिता पंचमीचे व्रत पाळले जाणार आहे. हा सण विशेषतः गुजरात आणि महाराष्ट्रात साजरा केला जातो.
देवी ललिता माता दुर्गेच्या दहा महाविद्यांपैकी एक मानली जाते. मान्यतेनुसार ती माता सतीचे रूप आहे. तिला त्रिपुरा सुंदरी असेही म्हणतात. या दिवशी माता ललिताचे व्रत आणि पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. तुम्ही ललिता पंचमी शुभेच्छा, ललिता पंचमी व्हॉट्सॲप मेसेजेस, ललिता पंचमी मराठी मेसेज, ललिता पंचमी व्हॉट्सॲप मेसेजे शेअर करून तुमच्या मित्र-परिवारास ललिता पंचमीच्या शुभेच्छा पाठवू शकता. यासाठी तुम्ही खालील मेसेज डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Lalita Panchami 2024 Date: ललिता पंचमी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व)
या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता…
नमस्तस्यै नमस्तयै नमस्तस्यै नमो नमः
ललिता पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

ललिता पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

ललिता पंचमीच्या मंगलमय शुभेच्छा!

ललिता पंचमीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

ललिता पंचमीच्या तुम्हाला व तुमच्या
कुटुंबाला मन:पूर्वक शुभेच्छा!

असे मानले जाते की जो कोणी ललिता पंचमीचे व्रत पाळतो आणि पूर्ण भक्तीभावाने माता ललिताची पूजा करतो, त्याला सुख-समृद्धी प्राप्त होते. मुलांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यासाठी हे व्रत पाळले जाते.