
History Of Easter Sunday 2025: ख्रिश्चन धर्माचे लोक ईस्टरचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. असं म्हटलं जातं की या दिवशी प्रभु येशूचा पुनर्जन्म झाला होता. खरं तर, ईस्टर संडेचा इतिहास (History Of Easter Sunday) ख्रिश्चन धर्माशी जोडलेला आहे. हा सण केवळ धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात नाही तर ख्रिश्चन धर्मातील सर्वात जुन्या आणि पवित्र सणांपैकी एक मानला जातो. यावेळी ईस्टरचा सण रविवार, 20 एप्रिल 2025 रोजी साजरा केला जाईल. त्यापूर्वी 18 एप्रिल रोजी गुड फ्रायडे साजरा करण्यात आला.
इस्टर संडेचा इतिहास -
येशू ख्रिस्त स्वतःला देवाचा पुत्र म्हणवून घेत होते म्हणून यहुदी धार्मिक नेत्यांनी त्याचा निषेध केला. त्याला रोमन राज्यपाल पॉन्टियस पिलाटसमोर हजर करण्यात आले आणि गुड फ्रायडेच्या दिवशी त्याला वधस्तंभावर खिळण्यात आले. क्रूसावर चढवल्यानंतर, येशू ख्रिस्त मरण पावले आणि त्यांना कबरीत पुरण्यात आले. बायबलनुसार, येशू ख्रिस्ताचा पुनर्जन्म तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी झाला. या चमत्कारिक घटनेला ईस्टर संडे म्हणतात. (हेही वाचा - Good Friday 2025 HD Images: आजच्या गुड फ्रायडेच्या दिवशी Messages, WhatsApp Status, Photos शेअर करत द्या प्रेम आणि शांतीचा संदेश)
ईस्टर संडे का खास आहे?
ईस्टर संडे हा ख्रिश्चन धर्माच्या लोकांसाठी खूप खास असतो. या दिवशी ख्रिश्चन धर्माचे लोक चर्चमध्ये एकत्र येतात, प्रार्थना करतात आणि या दिवशी चर्चला दिवे आणि फुलांनी सजवले जाते. ईस्टरच्या प्रार्थनेनंतर, लोक एकमेकांचे अभिनंदन करतात आणि प्रभु येशूच्या शिकवणींचे स्मरण करतात. तसेच या दिवशी लोक मेणबत्त्यांनी आपले घर सजवतात आणि प्रभु येशूच्या पुनरुत्थानाचा उत्सव साजरा करतात. (हेही वाचा: Good Friday 2025 Messages: गुड फ्रायडे निमित्त WhatsApp Status, Images, Photos द्वारे संदेश पाठवून स्मरण करा प्रभू येशूच्या बलिदानाचे)
प्राचीन मान्यतेनुसार, ईस्टर हा 2000 वर्षांहून अधिक जुना सण आहे. पूर्वी ईस्टर अगदी साध्या पद्धतीने साजरा केला जात असे, परंतु हळूहळू अंडी, ईस्टर बनी सजवण्याची आणि इतर अनेक कार्यक्रम आयोजित करण्याची परंपरा सुरू झाली. खरं तर, अंडी हे जीवन आणि पुनर्जीवनाचे प्रतीक मानले जाते, म्हणूनच इस्टरला अंडी रंगीबेरंगी रंगांनी सजवली जातात. हा सण केवळ ख्रिश्चन धर्माचा सर्वात पवित्र सण नसून हा सण अंधारानंतर प्रकाश येतो आणि मृत्यूनंतर जीवन असते असा संदेश देतो. हा दिवस प्रेम, त्याग आणि पुनर्जन्माचा उत्सव आहे, जो आपल्याला आशा आणि विश्वास शिकवतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. लेटेस्टली मराठी त्याची पुष्टी करत नाही.)