Good Friday 2025 Messages (File Image)

Good Friday 2025 Messages in Marathi: यंदा 20 एप्रिल रोजी ईस्टर संडे साजरा केला जाणार आहे. त्याआधी उद्या, 18 एप्रिल रोजी ‘गुड फ्रायडे’चा (Good Friday 2025) दिवस पाळला जाईल. हा ईसाई धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस येशू ख्रिस्ताच्या क्रूसावरील बलिदान आणि मृत्यूच्या स्मरणार्थ पाळला जातो. येशूच्या या त्यागाने मानवजातीच्या पापांचे प्रायश्चित केले आणि प्रेम, क्षमा आणि मुक्तीचा संदेश दिला. गुड फ्रायडे हा शोक, प्रार्थना आणि आत्मचिंतनाचा दिवस आहे, जो ईसाई समुदायाला येशूच्या शिकवणींची आणि त्यांच्या अतुलनीय प्रेमाची आठवण करून देतो.

ख्रिश्चन धर्मग्रंथांनुसार, येशू ख्रिस्ताला यहुदी शासकांनी आणि रोमन साम्राज्याच्या अधिकाऱ्यांनी राजद्रोहाचा आरोप लावून अटक केली होती. त्यांना गेथसेमाने बागेतून अटक करण्यात आले, जिथे त्यांचा शिष्य जुडसने काही नाण्यांसाठी त्यांचा विश्वासघात केला होता. येशूला अनेक शारीरिक आणि मानसिक यातना सहन कराव्या लागल्या. त्यांना काट्यांचा मुकुट घालून, चाबकाने मारहाण करून आणि अपमानित केले गेले. शेवटी, शुक्रवारी दुपारी त्यांना क्रूसावर खिळले गेले, जिथे त्यांनी मानवजातीच्या उद्धारासाठी आपले प्राण त्यागले. हा दिवस “गुड फ्रायडे” म्हणून ओळखला जातो.

या दिवसानिमित्त WhatsApp Status, Messages, Images द्वारे तुम्ही ख्रिस्ती बांधवांना काही संदेश पाठवू शकता. (हेही वाचा: Good Friday 2025 History and Significance: यंदा 18 एप्रिल रोजी पाळला जाणार 'गुड फ्रायडे'; जाणून घ्या ख्रिश्चन धर्मातील या महत्त्वाच्या आणि शोकपूर्ण दिवसाचे महत्व आणि इतिहास)

Good Friday 2025 Messages
Good Friday 2025 Messages
Good Friday 2025 Messages
Good Friday 2025 Messages
Good Friday 2025 Messages

गुड फ्रायडेचे ईसाई धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण येशू ख्रिस्ताच्या क्रूसावरील बलिदानाने मानवजातीला पापांपासून मुक्ती मिळवून दिली. ईसाई विश्वासानुसार, येशूने आपल्या मृत्यूद्वारे मानवजातीच्या पापांचे ओझे स्वीकारले आणि ईश्वराशी समेट घडवून आणला. हा त्याग प्रेम, करुणा आणि क्षमेचे सर्वोच्च उदाहरण मानला जातो. गुड फ्रायडे हा शोकाचा आणि आत्मचिंतनाचा दिवस आहे. ईसाई बांधव या दिवशी उपवास करतात, चर्चमध्ये प्रार्थना करतात आणि येशूच्या दुखःप्रसंगांचे स्मरण करतात. गुड फ्रायडे आपल्याला आपल्या चुका स्वीकारण्याची, इतरांना क्षमा करण्याची आणि प्रेमाने जीवन जगण्याची प्रेरणा देतो. भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्याने गुड फ्रायडे हा राष्ट्रीय सुट्टीचा दिवस आहे.