
International Kissing Day 2022: आंतरराष्ट्रीय चुंबन दिन 2022 (International Kissing Day) 6 जुलै रोजी साजरा होणार आहे. चित्रपटांमध्ये किंवा अगदी XXX पॉर्नमध्ये चुंबन पाहणे सोपे वाटत असले तरी किस घेणं सोप नाही. चुंबन दोन लोकांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या जोडण्याचे काम करते. ही एक प्रकारची प्रेमाची भाषा आहे, ज्याला शब्दांची गरज नाही. हे तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या मनाची स्थिती त्यांच्या डोळ्यांद्वारे किंवा त्यांच्या ओठांच्या हालचालींद्वारे समजून घेण्यास देखील मदत करते. अनेक संशोधनात असे दिसून आले आहे की, चुंबनामुळे तुमच्या शरीरात सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होते. इंटरनॅशनल किस डे (International Kissing Day) निमित्त चुंबन घेण्याचे फायदे, लिप किस कसे करायचे, फ्रेंच किस किंवा टँग किस कसे करायचे, आदी प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.
अनेकांना प्रश्न पडतो की, किस कसा घ्यावा? हा सर्वात मूलभूत आणि महत्त्वाच्या प्रश्नापैकी एक प्रश्न आहे. तुमच्या जोडीदाराला किस करताना तुम्हाला खालील टीप्स नक्की उपयोगात येतील. (हेही वाचा - Breakup Letter: 'मोठा भाऊ म्हणून मला माफ कर', प्रियकारने प्रेयसीला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल)
चुंबन घेताना या टिप्स लक्षात ठेवा -
- जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराचे चुंबन घेत असाल तेव्हा इतर कशाचाही विचार करू नका. जेव्हा तुमचे ओठ तुमच्या जोडीदाराच्या ओठांना स्पर्श करत असतील तेव्हा त्यावर लक्ष केंद्रित करा!
- एकदा तुमच्या ओठांनी तुमच्या जोडीदाराला स्पर्श केला की, ओठ थोडे मोकळे सोडा.
किस घ्यायला हलक्याने सुरुवात करा आणि आरामात चुंबन घ्या. जर तुमचा जोडीदार उत्कट होऊ लागला तर ते अधिक तीव्र करा.
- तुमच्या जोडीदाराची मान मागे किंवा बाजूला आरामात धरा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही जोडीदाराला कंबरेलाही धरू शकता.
- चुंबन घेताना, आपल्या जोडीदाराच्या चेहऱ्यावर किंवा केसांना स्पर्श करण्यासाठी बोटांचा वापर करा.
- मानेचे चुंबन घेताना हळू हळू वरच्या दिशेने जा आणि कानाभोवती हलका श्वास घ्या.
किस घेताना 'या' चुका करू नका -
- तुमचा श्वास तपासा. तुमच्या तोंडाची दुर्गंधी येणार नाही याची काळजी घ्या. चुंबन घेण्यापूर्वी, दातांच्या स्वच्छतेची काळजी घ्या.
- माउथ फ्रेशनर वापरा.
- जास्त जोरात बोलू नका. जोडीदाराबरोबर हळू-हळू बोला.
- तुमच्या जोडीदाराला आवडेल त्यापेक्षा जास्त चुंबन घेऊ नका. तुमच्या जोडीदाराची देहबोली अनुभवा, त्यानुसार किंसिंगचा वेग वाढवा.
लक्षात ठेवा, चुंबन घेताना तुम्हाला घाई करण्याची गरज नाही. सुरुवातीला एकमेकांच्या डोळ्यात बघून तुम्ही एकमेकांच्या खूप जवळ या. कोण किती वेगाने चुंबन घेतंय, ही स्पर्धा ठेऊ नका. हे ध्यानात ठेवावं लागेल.