Breakup Letter: 'मोठा भाऊ म्हणून मला माफ कर', प्रियकारने प्रेयसीला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल
Breakup | Representational Image (Photo Credits: Pixabay)

सोशल मीडियावर (Social Media) कधी कधी अशा काही गोष्टी व्हायरल (Viral) होतात ज्या पाहून हसू आवरणे कठीण होते. होय, सोशल मीडियावर (Social Media) असेच एक पत्र व्हायरल झाले आहे, जे एक ब्रेकअप लेटर (Breakup Letter) आहे. सोशल मीडियावर अशी अनेक पत्रं व्हायरल होत असतात. पण, या पत्रातील जो मजकूर आहे. तो मजकूर फारच मजेशीर असल्याने हे पत्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहे. एका प्रेयकराने ब्रेकअप लेटरमध्ये प्रेयसीला म्हटले आहे की, 'माझ्या चुका तू तुझा मोठा भाऊ म्हणून माफ कर'.

सोशल मीडियावर हे ब्रेकअप लेटर खूपच व्हायरल झाले आहे. सोशल मीडियावर हे पत्र अनेक लोक विविध प्लॅटफॉर्मवरुन शेअर करत आहेत. काहींनी या लेटर लाईक केले आहे. तर त्याखाली येणाऱ्या प्रतिक्रियाही चांगल्याच मजेदार आहेत. इतके व्हायरल झालेल्या या पत्रात असे आहे तरी काय?

प्रियकराने प्रेयसीला लिहिलेल्या पत्रात म्हटले की, माझ्या प्रिय प्रिये. 21 व्या शतकात माझ्यासारख्या मुलाची हिंमत होत नाही की, मी तुझ्यासारख्या मुलीशी रिलेशनशिपमध्ये राहू शकेन. त्यामुळे आपण दोघांनी मिळून ही रिलेशनशिप संपवूया असेही या प्रियकराने या पत्रात म्हटले आहे. पुढे तर आणखीच मजेशीर गोष्ट या पत्रात लिहिले आहे. या मुलाने पत्रात म्हटले आहे की, 'मला तू आपला मोठा भाऊ म्हणून माफ कर. तुझा जुना बॉयफ्रेंड सद्यास्थितीत तुझा भाऊ, सुजान.' (हेही वाचा, Bombay High Court on Kissing: ओठांचे चुंबन, शरीरस्पर्श यात काहीही गैर नाही, आरोपीला जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय)

Breakup Letter | (Photo Credits: Social Media)

या प्रियकराचे ब्रेकअप लेटर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. युजर्सही या पत्रावर जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने म्हटले आहे की, खूपच भारी लेटर. कदाचित प्रियकर आपल्या प्रेयसीला धडा शिकवू इच्छित आहे. यूजर्सने म्हटले आहे की, चांगले झाले. ब्रेकअप झाला. नाहीतर विवाहानंतर लिहिले असते तर तो एक हॅशटॅगच बनला असता. एकाने प्रतिक्रिया दिली आहे की, जगात लोक कसे कसे असतात. अगदीच हटके लव लेटर.