Vitthal Rukmini Vivah Sohala Live: वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणीच्या विवाह सोहळा येथे पहा लाइव्ह
विठ्ठल रुक्मिणी, पंढरपूर (Photo Credits-Facebook)

Vitthal Rukmini Vivah Sohala Live:  वसंत पंचमीचा सण हा हिंदू सणांपैकी एक महत्वाचा सण असून तो वसंत ऋतू सुरु झाल्यानंतर साजरा केला जातो. हा सण खासकरुन माघ महिन्यात साजरा करतात. जो ग्रॅग्रियन कॅलेंडरनुसार जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यादरम्यान येतो. तर वसंत पंचमी निमित्त सरस्वतीची पूजा केली जाते. याच पार्श्वभुमीवर संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नियमांचे पालन करुन तो साजरा होणार आहे. तर मंदिर प्रशासनाकडून लाईव्ह दर्शन आणि विवाह सोहळ्याचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे.(Vasant Panchami 2021 Images: वसंत पंचमी दिवशी WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शुभेच्छा द्या ज्ञानदेवता सरस्वतीच्या जन्मदिनाच्या!)

पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात वसंत पंचमी निमित्त फुलांची सजावट करण्यात  आली आहे. तर यंदाच्या विठ्ठल रुक्मिणीचा विवाहसोहळा खास असून साक्षात ब्रम्हदेव सरस्वती, शंकर पार्वती, विष्णू महालक्ष्मी, बालाजी पद्मावती, राधा कृष्ण या जोड्यांसह गणपती, नारदमुनी यासारखे स्वर्गातील देवही उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.  विठ्ठल रुक्मिणीच्या विवाह सोहळ्याचे येथे पहा लाइव्ह

विठ्ठल रुक्मिणी, पंढरपूर (Photo Credits-Facebook)

दरम्यान,  कामदेव मदनाचा जन्म याच दिवशी झाला, असे म्हटले आहे. दांपत्यजीवन सुखाचे जावे, यासाठी लोक रतिमदनाची पूजा आणि प्रार्थना करत असत. आपल्याकडील प्रत्येक सण, उत्सवाला एक विशेष अर्थ आहे. तसंच वसंत पंचमीही अर्थपूर्ण आहे. सृष्टीतील नवचैतन्य, नवनिर्मितीमुळे मिळणारा आनंद साजरा करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो.