भारतामध्ये 16 डिसेंबर हा दिवस विजय दिवस (Vijay Diwas) म्हणून साजरा केला जातो. भारतातील हौतात्म्यांसाठी या दिवशी आदरांजली अर्पण केली जाते. 1971 साली भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धाच्या विजयाचं सेलिब्रेशन या निमित्ताने केलं जातं. यामधूनच बांग्लादेश ची निर्मिती झाली आहे. बांग्लादेशात हाच दिवस Bijoy Diwas म्हणून देखील साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने भारतीय लष्कराचे बळ असलेल्या आर्मी, एअर फोर्स आणि नेव्ही यांना सलाम करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.
विजय दिवस चा इतिहास
विजय दिवस सेलिब्रेशनचा इतिहास 1971 चा आहे. 71 ला भारत-पाक युद्ध झालं होतं. 3 डिसेंबर पासून हे युद्ध सुरू झालं होतं. 13 दिवसांच्या लढाईनंतर 16 डिसेंबरला ते संपलं. 16 डिसेंबरला पाकिस्तानी लष्कर बिनशर्त शरण आलं होतं. ही प्रक्रिया 16 डिसेंबर 1971 पासून सुरू झाली होती. 93 हजार पाकिस्तानी सैनिक शरण आले होते. पाकिस्तानी लष्कराचे मेजर-जनरल अमीर अब्दुल्ला खान नियाझी यांनी भारतीय लष्कर आणि बांग्लादेशच्या Mukti Bahini यांला ‘Instrument Of Surrender' वर स्वाक्षरी दिली होती. याच्या माध्यमातून भारताला प्रादेशिक शक्तींपैकी एक म्हणून मान्यता देणारं चित्र उभं राहिलं होतं.
बांगलादेश मुक्ती युद्धाचा परिणाम पश्चिम पाकिस्तानने लोकांशी केलेल्या वाईट वागणुकीमुळे आणि पूर्व पाकिस्तानमधील निवडणुकीच्या निकालांना कमी लेखल्यामुळे हा संघर्ष झाला. त्यानंतर 26 मार्च 1971 रोजी पूर्व पाकिस्तानने वेगळे होण्याचे आवाहन सुरू केले. त्यानंतर, भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बांगलादेशला स्वातंत्र्याच्या लढ्यात मदत करण्याची इच्छा व्यक्त केली.
भारताच्या इतिहासात हा दिवस महत्त्वपूर्ण आहे कारण भारताच्या पूर्वेकडील भागात मोठ्या प्रमाणात निर्वासित आल्याने युद्ध सुरू झाले. हे युद्ध भारतासाठी ऐतिहासिक युद्ध मानले जाते. म्हणूनच 16 डिसेंबर हा दिवस 'विजय दिवस' म्हणून0 देशभरात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. 1971 च्या युद्धात सुमारे 3,900 भारतीय जवान शहीद झाले होते आणि सुमारे 9,851 जखमी झाले होते. या युद्धात पाकिस्तानचे सर्वाधिक नुकसान झाले असून सुमारे 8,000 जण मरण पावले आणि 25,000 जखमी झाले होते.
भारताचे संरक्षण मंत्री आणि भारतीय सशस्त्र दल, लष्कर, हवाई दल आणि नौदल यांचे प्रमुख या दिवशी इंडिया गेट अमर जवान ज्योती येथे सैनिकांना आदरांजली वाहतात.