
Veer Savarkar Jayanti 2023 HD Images: स्वतंत्र्यसैनिक, राष्ट्रवादी नेते, वकील, लेखक, समाज सुधारक, प्रखर हिदुत्ववादी नेते विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती (Veer Savarkar Jayanti 2023). वीर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिक जवळील भगूर गावात झाला. सावरकर हे भारतातील महान क्रांतिकारकांपैकी एक होते. ब्रिटिशांविरोधातील कारवायांमुळे त्यांना दोन वेळा जन्मठेप सुनावण्यात आली होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचे रक्त जितके सळसळत होते, तितकीच सळसळणारी शाई त्यांच्या लेखणीत होती. सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये झाले.
चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे, ‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन,’ अशी शपथ घेतली होती. त्यांच्या कविता, गाणी तसेच भाषणांमधून त्यांचे देशाविषयी असणारे प्रेम, तळमळ ही क्षणक्षणाला दिसून येते.
तर वीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त Images, Whatsapp Status, Wishes, Quotes, Greetings, Messages शेअर करून करा क्रांतीसूर्याला विनम अभिवादन.





(हेही वाचा: यंदा मॉरिशस येथे होणार सावरकर विश्व संमेलन; सावरकरांच्या पुतळ्याच्या अनावरणासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन)
दरम्यान, वीर सावरकर यांनी आपल्या ‘हिंदुत्व’ या पुस्तकात द्विराष्ट्र सिध्दांताची स्थापना केली. ज्यात हिंदू आणि मुस्लिमांसाठी वेगवेगळे राष्ट्र असावे असे म्हटले होते. वीर सावरकरांनी 10,000 पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत, तर 1500हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. फारच थोड्या मराठी लेखकांनी इतके मौलिक लिखाण केले असेल. त्यांच्या ‘सागरा प्राण तळमळला' या कवितेला 2009 साली 100 वर्षे पूर्ण झाली.