
Veer Savarkar Jayanti 2020 Wishes: विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांची आज 137 वी जयंती सर्वत्र साजरी होत आहे. सावरकर यांचा जन्म नाशिक (Nashik) जिल्ह्यातील भगूर (Bhagur) येथे 28 मे 1883 रोजी झाला. विचारवंत, लेखक, तत्त्वज्ञ, भाषाकार आणि स्वातंत्र्यसेनानी असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी कवी व लेखक होते.
वि. सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण तसेच स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी आणि हिंदुसंघटक होते. विनायक दामोदर सावरकर यांच्या 137 व्या जयंती निमित्त Messages, HD Images, Wallpapers शेअर करून विनम्र आदरांजली द्या! (वाचा - Pandit Jawaharlal Nehru Punyatithi 2020: भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 56 व्या पुण्यतिथी निमित्त पहा त्यांचे काही दुर्मिळ फोटोज!)





सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक व पत्रकार प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिली होती. सावरकरांनी 1857 चा 'स्वातंत्र्यसमर' हा ग्रंथ लिहीला. या ग्रंथात सावरकरांनी आपले विचार मांडले आहेत.