पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांची भारत देशाला चाचा नेहरू अशी देखील ओळख आहे. पंडित नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. 1947 साली देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी कार्यभार स्वीकारला. मोतीलाल नेहरू आणि स्वरूप राणी या जोडप्याच्या पोटी जवाहरलाल नेहरू यांचा 14 नोव्हेंबर 1889 साली जन्म झाला. नेहरू यांनी वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. भारतीय राजकारणामध्ये सक्रिय झाले आणि देशाचे पहिले पंतप्रधान झाले.
भारतामधील ब्रिटीशांची सत्ता उलथून लावण्यापासून ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताची विस्कटलेली सामाजिक, आर्थिक घडी बसवण्यासाठी पंडित नेहरू यांनी विशेष योगदान दिले आहे. 1964 साली पंडित नेहरू यांचे हृद्यविकाराच्या धक्क्याने निधन झाले. आज पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 56व्या पुण्यतिथी निमित्त पहा त्यांचे काही दुर्मिळ फोटो!
Pandit Jawaharlal Nehru Punyatithi : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो - Watch Video
1962 नंतर पंडित नेहरू यांची प्रकृती सतत्याने ढासळत होती. 26 मे 1964 दिवशी पंडितजी देहरादून येथून परतले होते. रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांना बोलवण्यात आले मात्र त्यांची प्राणज्योत मालवली होती. 27 मे दिवशी लोक सभेमध्ये त्यांच्या निधनाची अधिकृत घोषणा करण्यात आली.