
Veer Savarkar 136th Birth Anniversary: प्रखर हिंदू विचारवंत विनायक दामोदर सावरकर(Vinayak Damodar Savarkar) हे स्वातंत्र्यसेनानी सोबतच लेखक, तत्त्वज्ञ, भाषाकार होते. मातृभूमीच्या प्रेमापोटी त्यांनी आपलं जीवन अर्पण केलं. कठोर काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. आज 28 मे ही त्यांची जयंती आहे. यंदा भारतासह परदेशात स्वातंत्र्यसेनानी वीर सावरकर यांची 136 वी जयंती साजरी केली जात आहे. देशभक्त सावरकरांचं संपूर्ण आयुष्य आजच्या पीढीसाठी प्रेरणास्थान आहे. हा प्रत्यय त्यांच्या विचारांमधूनही येतो. म्हणूनच आज त्यांच्या जयंती निमित्त पुढच्या पिढीसाठी आदर्श असणार्या या भारतमातेच्या सुपुत्राचे विचार व्हॉट्सअॅप(WhatsApp), मेसेंजर (Messenger) , मेसेजेस (SMS) यांच्यामाधून पुढच्या पिढीला नक्की पोहचवा.
वीर सावरकर यांचे प्रेरणादायी विचार





वीर सावरकर केवळ स्वातंत्र्यसेनानी नव्हते सोबतच ते क्रांतिकारक, भाषाशुद्धी, लिपीशुद्धी चळवळीचे समर्थक होते. विज्ञानाचा पुरस्कार करत त्यांनी जातीभेदालाही प्रखर विरोध केला होता.