Vat Purnima 2019: यंदा वट पौर्णिमेच्या दिवशी जुळून आलाय रविवारचा खास योग, वडाच्या झाडासोबत 'या' देवतेची पूजा केल्यास होऊ शकतो लाभ
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

सुवासिनींचा हक्काचा सण अशी ओळख असणारी वट पौर्णिमा (Vat Purnima 2019) ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला म्हणजे उद्या 16 जून रोजी महाराष्ट्रभर साजरी होणार आहे. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी तसेच जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करत दिवसभर व्रत करतात. वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून करण्यात येणारी पूजा हा या व्रताचा मुख्य भाग असतो. पण यंदा वट पौर्णिमा आणि रविवार (Sunday) हा योग एकत्र आल्याने वडाच्या झाडासोबतच सूर्य देवतेची पूजा केल्यास अधिक लाभ होऊ शकतो असे ज्योतिष अभ्यासकांतर्फे सांगण्यात येत आहे.

ग्रहांच्या अभ्यासानुसार रविवार हा सूर्य देवतेच्या पूजेचा वार म्हणून मानला जातो. सूर्य हा शक्ती, तेज व बुद्धीची देवता म्हणून ख्यात आहे. त्यामुळे उद्या सूर्य देवतेची पूजा केल्यास पतीला आयुष्यासोबतच या तीन गोष्टींचे देखील वरदान मिळवता येऊ शकते. Vat Purnima 2019 Vrat Date: वटसावित्री व्रतारंभ ते वटपौर्णिमा पूजा करण्याचा यंदाचा शुभ मुहूर्त काय?

जाणून घ्या कशी कराल सूर्याची पूजा

  • रविवारी सकाळी लवकर उठून सूर्य देवतेला तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करा.
  • जल अर्पण करत असताना सातत्याने ऊँ सूर्याय नम: या मंत्राचा जप करा.
  • जल अर्पण केल्यावर सूर्याची स्तुती करणाऱ्या मंत्राचा जप करावा, जप करतेवेळी आपल्या पतीला
  • शक्ती, बुद्धी, मान आणि आरोग्य प्राप्त होण्यासाठी प्रार्थना करावी.
  • पूजा करतेवेळी धूप व आरती केल्यास घरात मांगल्य व सकारत्मकता पसरण्यास मदत होते.
  • आपल्या इच्छा व ऐपतीप्रमाणे तांबे, गुळ, पिवळी वस्त्रे, गहू, लाल चंदन या गोष्टींचे दान करावे.
  • या दिवसापासून रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करून दिवसाची सुरवात करावी.

वट पौर्णिमेच्या दिवशी रविवार आल्याचा धार्मिक फायदा सोडल्यास प्रत्यक्ष स्थितीत देखील विवाहितांसाठी हा योग खास असणार आहे. या दिवशी अनेकांना सुट्टी असल्याने व्रत वैकल्यासोबतच तुमच्या पतिराजांसोबत थोडा खास वेळ घालवून देखील तुम्ही सेलिब्रेट करू शकता. Vat Purnima 2019 Wishes and Messages: सुवासिनीसाठी खास असणार्‍या वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देणारी मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status!

(तळटीप- हा लेख प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे. लेटेस्टली मराठी याची कोणतीही पुष्टी करत नाही)