
Vat Purnima Marathi Greetings: वटपौर्णिमा हा महाराष्ट्रातील सुवासिनींसाठी महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. यंदा 16 जून म्हणजेच रविवारी हा सण महाराष्ट्रभर साजरा केला जाणार आहे. पारंपारिक रूढी आणि धर्मानुसार स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि साताजन्माची गाठ पक्की रहावी म्हणून प्रार्थना करून वडाची पूजा करतात. तुमच्या साथीदाराला या दिवसाच्या शुभेच्छा आजच्या डिजिटल युगात SMS, Quotes, Wishes, Images व्हॉट्सअॅप स्टेट्स (WhatsApp Status), फेसबुक मेसेंजरच्या (Facebook Messenger) माध्यमातून ही मराठमोळी ग्रिटिंग्स शेअर करायला बिलकूल विसरू नका. वटसावित्री व्रतारंभ ते वटपौर्णिमा पूजा करण्याचा यंदाचा शुभ मुहूर्त काय?
वटपौर्णिमा 2019 ग्रिटिंग्स आणि मेसेजेस
आपल्या संस्कृतीची प्रतिमा
सावित्रीच्या निष्ठेचं दर्पण
बांधुनी नात्याचं बंधन
करेन साता जन्माचं समर्पण
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !
पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेचं बंधन
सात जन्माच्या सोबतीसाठी जन्मोजन्मीचे समर्पण
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!

प्रार्थना सौभाग्याची,
पूजा वटपौर्णिमेची!
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|
तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |
अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||
वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन:।
वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ।।

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

वटपौर्णिमा शुभेच्छा संदेश व्हिडिओ
वडाची पूजा जशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी केली तसेच वडाचे झाड हे 24 तास ऑक्सिजन देणारे एकमेव झाड आहे. त्यामुळे सतत चूल आणि मूल यांच्यामध्ये रमणार्या महिलांना बाहेर पडून काही काळ त्यांच्या सख्यांसोबत घालवता यावा यासाठीही वडाच्या झाडाची पूजा करण्यामागे एक उद्देश होता असं सांगितलं जातं.