Vasubaras 2024 Messages In Marathi (File Image)

Vasubaras 2024 Messages In Marathi: देशभरात सर्वत्र सध्या दिवाळीची (Diwali 2024) लगबग सुरु आहे. महाराष्ट्रात वसुबारस (Vasubaras 2024) सणाने दिवाळीची सुरुवात होते. वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते. आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी वसुबारस साजरी केली जाते. यंदा 28 ऑक्टोबर 2024 रोजी वसुबारस दिवस साजरा होणार आहे. यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारत हा कृषिप्रधान देश आहे. गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत असे मानले जाते. भारतात गाईला मातेचा दर्जा आहे. गाय ही पूजनीय मानली गेली आहे. म्हणुनच वसुबारस या दिवशी गायीची पूजा करण्याची प्रथा पडली.

समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून वसुबारसचे व्रत केले जाते. स्त्रिया या दिवशी दिवसभर उपवास करतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून स्त्रिया वसुबारसदिवशी गायीची पूजा करतात. या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढून दिवाळीची सुरुवात होते.

तर अशा मंगलमय दिनी Messages, Wishes, HD Images, Wallpapers, Greetings च्या माध्यमातून द्या वसुबारच्या शुभेच्छा.

Vasubaras 2024 Messages In Marathi
Vasubaras 2024 Messages In Marathi
Vasubaras 2024 Messages In Marathi
Vasubaras 2024 Messages In Marathi
Vasubaras 2024 Messages In Marathi

(हेही वाचा: Diwali 2024 Date, Laxmi Puja Muhurat: दिवाळी, लक्ष्मीपूजन तारीख, मुहूर्त आणि मुहूर्त व्यापार कधी? घ्या जाणून)

दरम्यान, या दिवशी घरात देवी लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने, गाईच्या पायावर पाणी घालतात, तिला हळदी-कुंकू आणि अक्षदा वाहतात. ज्यांच्या घरी गुरे-वासरे आहेत त्यांच्या घरी या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करून, गायीला नैवेद्य खायला दिला जातो. वसुबारसदिवशी गहू, मूग खाऊ नये असे सांगितले जाते. महिला या दिवशी  बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडला जातो. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत.