Lord Vishnu (Photo Credit - Facebook)

वैशाख मासातील कृष्णपक्ष एकादशी ही वरूथिनी एकादशी (Varuthini Ekadashi 2020)  म्हणून ओळखली जाते. पद्म पुरणात दिलेल्या संदर्भानुसार, या एकादशीचे माहात्म्य सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याशी जोडलेले आहे. विशेषतः लग्न जीवनाशी संबंधित अनेक समस्यांवर या दिवशी व्रत केल्याने उपाय सापडतो असे मानले जाते. तसेच वाईट सवयी जसे की, जुगार खेळणे, छोट्यामोठ्या चोऱ्या करणे, खोटे बोलणे, हिंसक स्वभाव, तापट वृत्ती या सर्व जाळातून मुक्ती मिळवण्यासाठी या एकादशीला व्रत करण्याचे सुचवले जाते. या व्रतामध्ये श्री विष्णूंचे पूजन केले जाते. कालदर्शिकेनुसार, आज 18 एप्रिल रोजी वरूथिनी एकादशीची तिथी आहे. यंदा हा दिवस शनिवारीच आल्याने याला खास महत्व आहे. यानिमित्त वरूथिनी एकादशीच्या व्रताची कथा, पूजा विधी जाणून घ्या. राशीभविष्य 18 एप्रिल 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

वरूथिनी एकादशीचे महत्व आणि व्रत कथा

प्राचीन काळी नर्मदा नदीच्या तटावर मांधाता नामक राजाचे राज्य होते, हा राजा अत्यंत दानी, दयावान आणि तपस्वी होता, एके दिवशी मांधाता राजा तप करत बसलेले असताना त्यांच्या पयला धरून एक अस्वल त्यांना जंगलात खेचून घेऊन गेले, पण तपात मग्न असलेल्या राजांना त्याची चाहूल सुद्धा लागली. जेव्हा त्यांची तंद्री सुटली तेव्हा मात्र प्रत्यक्ष मृत्यूला समोर बघून त्यांनाही भीती वाटली. अशावेळी आपल्या रक्षणासाठी त्यांनी श्रीविष्णूच्या नावाचा जप सुरु केला. राजाची पुकारणी ऐकताच विष्णूने थेट प्रकट होऊन आपल्या सुदर्शन चक्राने अस्वलाचा वध केला.

यावेळी मांधाता राजाने विष्णूला वंदन केले असता, स्वतः श्रीविष्णूने राजाला त्याचे पाय पूर्ववत करण्यासाठी मार्ग सांगितला. यानुसार, मथुरेत श्रीविष्णूच्या वराह रूपाचे पूजन केले गेले, हा दिवस वैशाखातील कृष्णपक्ष एकादशीचा होता, त्यामुळेच पुढे राजाचे पाय ठीक होऊन त्याला मोक्षप्राप्ती झाली. असं म्हणतात की वरूथिनी एकादशीच्या व्रताचे पुण्य हे दहा हजार व्रतांच्या बरोबरीचे असते.

वरूथिनी एकादशी व्रत आणि पूजा विधी

वरूथिनी एकादशी निमित्त श्रीविष्णूच्या वराह रूपाचे पूजन करायचे असते. यानिमित्त एक दिवस आधीच्या रात्रीपासूनच उपवास करायचा असतो. दशमीच्या रात्री उडीद, मसूर, चणे, मध व इतरांनी बनवलेले अन्न सोडून अन्य पदार्थ ग्रहण केले जाऊ शकतात. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्यावे. विष्णूच्या प्रतिमेचे पूजन करावे. व्रत कथा ऐकावी. श्रीविष्णूला नाईवाडीया दाखवताना केवळ सात्विक अन्नाचा नैवद्य दाखवावा. व्रत करणाऱ्या उपासकाने यादिवशी कलिंगड किंवा टरबुजाचा फलाहार घ्याव.

(टीप- वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे. यामार्गे अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)