Valentine Day 2020 Gift Ideas: प्रेमाचा गुलाबी दिवस समजल्या जाणा-या व्हॅलेंटाईन डे ला तुमच्या जोडीदाराला द्या भेटवस्तू म्हणून 'या' Useful गोष्टी
Valentine Day (Photo Credits-Facebook)

Valentine Day Best Gift Ideas: आपल्या प्रिय व्यक्तीला आपले त्याच्यावर किती प्रेम आहे हे व्यक्त करण्याचा खास दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. तसं प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्या विशेष दिवसाची गरज नसते. मात्र तरीही हा दिवस विशेष मानला जातो. या दिवशी अनेक प्रेमी युगुल, विवाहित जोडपी आपल्या जोडीदारासोबत एकत्र वेळ घालवतात. छान लाँग ड्राईव्ह जातात, डेटिंगला जातात. अशा वेळी आपल्या जोडीदाराला काहीही भेटवस्तू घेऊन न जाणे म्हणजे पापच. नाही का? या गुलाबी क्षणाची त्या दोघांना आठवण राहावी म्हणून आपण काही ना काही भेटवस्तू आपल्या जोडीदाराला घेऊन जातो.

अशा वेळी काय गिफ्ट द्यावे असा मोठा प्रश्न जोडीदाराला पडलेला असतो. ग्रीटिंग्स, पुष्पगुच्छ, चॉकलेट्स ही सर्वसाधारणपणे गिफ्ट दिली जातात. मात्र त्यात जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला उपयोगी अशा गोष्टी भेटवस्तू म्हणून दिल्या तर आपल्या जोडीदाराचा आनंद आणखी द्विगुणित होईल.

1. मुलींसाठी

1) जिम वेअर किंवा जिम अॅक्सेसरीज

जर तुमची महिला जोडीदाराला जिम ला जात असेल किंव फिटनेसवर भर देत असेल तर तिला जिम स्यूट, जिम अॅक्सेसरिज, शूज गिफ्ट देऊ शकता.

2) ब्युटी पार्लर मेंबरशिप

मुलींना मेकअप हा खूप प्रिय आणि आवडीचा असतो. अशावेळी तुम्ही त्यांनी एखाद्या ब्रँडेड पार्लरची मेंबरशीप देऊ शकता.

3) ऑर्गनायजर पाउच

कपडे कपाटात कोंबण्याची सवय अनेकांना असते. अशावेळी थोडी शिस्त लागण्यासाठी आणि कपाट चांगले दिसण्यासाठी चांगल्या ऑरगनायझर पाऊच द्या. मेकअप किट, ज्वेलरी, ब्लाऊज, नव्या साड्या, ब्रा , शूज असे बरेच काही ठेवण्यासाठी हे ऑरगनायझर उपयोगाचे असतात.

4) वेबसीरिजचे सब्सक्रिप्शन

सध्या आपल्यापैकी अनेकांना नेटफ्लिक्सवर वेबसीरिज पाहण्याचे वेड लागले आहे. अशातच जर तुमच्या जोडीदाराला देखील ऑनलाईन वेबसिरीज पाहण्याची आवड असेल तर तुम्ही त्यांना नेटफ्लिक्स चे सब्सक्रिप्शन देऊ शकता.

Valentine Week 2020 List: यंदा रोझ डे ते वेलेंटाइन डे 2020 ची संपूर्ण लिस्ट PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा आठवड्याभराचं रोमॅन्टिक सेलिब्रेशन!

2. मुलांसाठी

1) वेबसीरिजचे सब्सक्रिप्शन

मुलींप्रमाणे मुलांनाही नेटफ्लिक्सवर वेबसीरिज पाहण्याचे वेड लागले आहे. अशातच जर तुमच्या जोडीदाराला देखील ऑनलाईन वेबसिरीज पाहण्याची आवड असेल तर तुम्ही त्यांना नेटफ्लिक्स चे सब्सक्रिप्शन देऊ शकता.

2) ब्लूटुथ हेडफोन, स्मार्टबँड, ब्लूटुथ स्पीकर

मुलांना गॅजेट्सची फार आवड असते. त्यामुळे तुम्ही त्यांना तुमच्या बजेटमध्ये येणारे ब्लूटुथ हेडफोन, स्मार्टबँड, ब्लूटुथ स्पीकर गिफ्ट म्हणून देऊ शकता.

3) जिम वेअर किंवा जिम अॅक्सेसरीज

मुलींसमोर चांगले इम्प्रेशन पडावे म्हणून मुले फिटनेसवर जास्त लक्ष देतात. त्यासाठी नित्य नियमाने ते जिमला जातात. अशा वेळी तुम्ही त्यांना स्मार्टबँड, शूज, जिम बॅग वा अन्य अॅक्सेसरीज गिफ्ट म्हणून देऊ शकता.

4) शेव्हिंग किट

शेव्हिंग किट हे देखील मुलांसाठी रोजच्या जीवनातील महत्वाची गोष्ट आहे. सकाळी ऑफिसला जाण्यासाठी क्लिन शेव्ह करण्यासाठी अनेकांना त्याची गरज पडते. त्यामुळे तुम्ही तुमच्या पुरुष जोडीदाराला हे गिफ्ट देऊ शकता.

वर सांगितलेल्या गोष्टी तुम्ही तुमच्या जोडीदाराला देऊन तुम्ही यंदाचा व्हॅलेंटाईन डे स्पेशल करु शकता. नक्की ट्राय करुन पाहा.