Dance Day | Photo Credits: Twitter/ @prahladspatel

जगभरात 29 एप्रिल हा दिवस जागतिक नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये नृत्य कलेचा शास्त्रीय वारसा आहे. भारतामध्येही भरतनाट्यम, कथ्थक सारखे शास्त्रीय नृत्यप्रकार आहेत तर लावणी, जाखाडी, बाल्या डांस सारखे लोकप्रकारदेखील पहायला मिळतात. पुराणातील कथा ते मनातील भावभावना या नृत्याच्या माध्यमातून व्यक्त करता येतात. अनेक कलाकारांचं पोट या कलेवर अवलंबून आहे. त्यामुळे यंदाच्या जागतिक नृत्य दिनाचं औचित्य साधून कलाकारांना प्रोत्साहन आणि शबासकीची थाप देण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक राज्य मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी आज त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर देशभरातील विविध नृत्यप्रकारांचे व्हिडिओ शेअर करत कलाकारांचे अभिनंदन केले आहे. यामध्ये राजस्थानचे घुमर नृत्य ते महाराष्ट्राच्या 'लावणी'चा समावेश आहे.

'लावणी' हा महाराष्ट्राच्या लोकप्रिय पारंपारिक नृत्य प्रकारापैकी एक आहे. शृंगारानुसार लावणी ही वेगवेगळ्या प्रकारे सादर केली जाते. पूर्वी या लोकप्रकाराकडे सामान्य विशिष्ट नजरेने पाहत होते. मात्र हळूहळू पुरोगामी महाराष्ट्रात साहित्य, सिनेमा यांच्यामधून 'लावणी'कडे बघायचा दृष्टीकोन बदलला.

सांस्कृतिक राज्य मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांचं ट्वीट

राजस्थानचं घुमर नृत्य  

कथ्थक नृत्य 

दक्षिण भारतातील कथकली 

काऊंसिल ऑफ इंटरनॅशनल डान्स (सी.आय.डी.) ही ‘युनेस्को’सोबत असलेली असलेली सेवाभावी संस्था पॅरिसमध्ये आहे. काऊंसिल ऑफ इंटरनॅशनल डान्सची स्थापन 1973 साली झाली तर 1982 पासून ‘आंतरराष्ट्रीय नृत्य दिन’ जगभरात साजरा करण्यास सुरुवात झाली.