Tulsi Vivah 2018 : दिवाळी संपली की वेध लागतात ते तुळशी बारशीचे. कारण तुळसी बारशीला तुळशी विवाह केला जातो. काही मंडळी तर वसुबारसेला सुरु झालेली दिवाळी तुळशीबारशीपर्यंत साजरी करतात. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुळशीचे लग्न ही वेगवेगळ्या कारणांसाठी महत्त्वाची असते. तुळशीचे लग्न हा अनेक कुटुंबामध्ये धुमधडाक्यात साजरा करण्याचाच कार्यक्रम. अगदी खऱ्याखुऱ्या लग्नासारखा. हा विवाह तर साजरा केला जातो. पण, तुम्हाला माहिती आहे का की, तुळशीचे लग्न नेमके का लावले जाते? कशी सुरु झाली ही परंपरा
सांगितले जाते की, तुळशीचा विवाह केल्याने भगवाण विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होते. कारण, पोथी-पुराणात सांगितलेल्या कथेनुसार तुळस ही लक्ष्मीचे तर भगवान विष्णूने शाळीग्रामचे रुप धारण केले होते. त्यांनी असे का केले याचे उत्तर ब्रह्मवैवर्त पुरानातील कथेत मिळते. ( या कथेबाबत वाचण्यासाठी इथे क्लिक करा) आज विज्ञानाचे युग असले तरीही परंपरेने चालत आलेल्या प्रथा आजही पाळल्या जातात. कालपरत्वे त्यात बदल झाला असला तरी, मूळ भावना तीच आहे. लोक मानतात की तुळशीचे लग्न लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. म्हणजेच घरात धनधान्य, संपत्ती आणि इतर मालमत्ता वाढते. अर्थात याला अद्याप तरी वैज्ञानिक अधार प्राप्त झाला नाही.
दरम्यान, तुळशीच्या लग्न सर्वासामान्य विवाह होतात तसेच लावले जाते. तुळशीला बांशींग बांधले जाते. उसाचा वाडाही सोबत ठेवला जातो. तुळीशीवृंदावनाच्या आजुबाजूला रांगोळी काढली जाते. मंगलास्टका म्हटल्या जातात. फटाके फोडले जातात. शेवटी छानसा प्रसादही दिला जातो. महाराष्ट्रासह देशभरात सर्वत्र हा उत्सव साजरा केला जातो.