हिंदू धर्मीय कार्तिकी पौर्णिमे दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा (Tripurari Purnima) साजरी करतात. यंदा ही त्रिपुरारी पौर्णिमा 8 नोव्हेंबर दिवशी आहे. उत्तर भारतामध्ये हा दिवस देव दीपावली (Dev Deepavali) म्हणून देखील साजरा करण्याची पद्धत आहे. मग त्रिपुरारी पौर्णिमा अर्थात कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या नातलगांसोबत, मित्रमंडळींसोबत या दिवसाचा आनंद द्विगुणित करून हा दिवस स्पेशल अंदाजात साजरा करा. त्यासाठी सोशल मीडीयामध्ये तुम्ही त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठमोळ्या मेसेजेस,Wishes, HD Images, Greetings, WhatsApp Status द्वारा शेअर करू शकता.
कार्तिक महिना भगवान विष्णूला समर्पित केलेला असतो. पवित्र महिन्यांपैकी एक कार्तिक महिना असल्याने या महिन्यातही विशेष पूजा-अर्चा केल्या जातात. दिवाळीचा उत्तरार्ध या दिवसात असल्याने त्रिपुरारी पौर्णिमेदिवशी देखील दिवे लावले जातात. सारा परिसर पणत्या, दिव्यांनी उजळून निघतो. नक्की वाचा: Kartik Purnima 2022: उद्या आहे कार्तिक पौर्णिमा; जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजाविधी.
त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा
स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शुभेच्छा!
तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
कार्तिकी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही दिशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
कार्तिकी पौर्णिमा आणि देव दीपावलीच्या
हार्दिक शुभेच्छा!
कार्तिक पौर्णिमेला भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या एका राक्षसाचा वध केला होता. अशी पुराणकथा आहे. या राक्षसाच्या वधानंतर भगवान श्री शंकर यांची ओळख त्रिपुरारी झाली. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक पूजेचे सुद्धा महत्व आहे. ते सहा कृत्तिकांचे प्रिय पुत्र होते, अशी धारणा आहे. शिवा, संभूती, संतती, प्रीती, अनुसया व क्षमा नावाच्या कृत्तिकांचे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पूजन केल्यास भगवान शंकर व त्यांच्या परिवाराची कृपा आपल्यावर राहते. या दिवशी भगवान शंकर, पार्वती आणि कार्तिकेय व श्रीगणेशाची पूजा केल्यास घरात सुख, शांती आणि समृध्दी नांदते. अशी देखील भावना आहे. मग या निमित्ताने तुमच्या प्रियजणांसोबत या दिवसाचा देखील आनंद द्विगुणित करा.