Teddy Day 2019 (Photo Credits-Pixabay)

Valentine’s Day 2019: व्हेलेंटाईन डे (Valentine Day) म्हणजे तरुणाईसाठी उत्साह आणि आनंदाने भरलेला असतो. 7 फेब्रुवारी पासून सुरु झालेल्या या व्हेलेंटाईन वीक (Valentine Week) च्या चौथ्या दिवशी 10 फेबुवारी टेडी डे (Teddy Day) साजरा केला जातो. मित्र-मैत्रिण आणि कपल्स एकमेकांना टेडी बेअर गिफ्ट देऊन या दिवसाचा आनंद लूटतात. टेडी डे हा प्रेमवीरांसाठी खूप खास असतो. कारण या दिवशी टेडी देऊन आपल्या प्रेमाची मागणी आवडत्या व्यक्तीकडे करतात.

जर तुम्हाला प्रिय व्यक्तीला त्यांच्या आवडत्या रंगाचा टेडी दिल्यास तो कायम लक्षात राहिल. तसेच टेडी बेअर बाजारात विविध रंगाचे पाहायला मिळतात. मात्र नेमका कोणत्या रंगाच्या टेडी बेअरचे काय महत्व आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (हेही वाचा-Happy Teddy Day 2019: टेडी डे' साठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे Facebook, WhatsApp Status, SMS, Greetings च्या माध्यमातून पाठवा तुमच्या प्रिय व्यक्तीला)

प्रेम व्यक्त करण्यासाठी लाल रंगाचा टेडी बेअर द्या

गुलाब हे जसे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. तर पिवळे गुलाब हे मैत्रीचे प्रतीक मानले जाते. त्याचप्रमाणे तुम्हाला टेडी बेअरच्या रंगाची निवड करायची आहे. तुम्ही कोणावर तरी प्रेम करत असून त्याला मनातील गोष्ट सांगायची असेल तर लाल रंगाचा टेडी बेअर आवर्जून गिफ्ट करा.

मैत्री निभावण्यासाठी पिवळ्या रंगाचा टेडी बेअर द्या

तुम्ही कोणत्याही मित्र-मैत्रिणीची आठवण काढत असाल तर मैत्रीचे नाते अजून घट्ट बनवण्यासाठी पिवळ्या रंगाचा टेडी बेअर गिफ्ट करा. पिवळ्या रंगाचा टेडी मैत्रीचे प्रतीक मानले जाते.

डेटवर घेऊन जाण्यासाठी गुलाबी टेडी द्या

जर तुम्हाला कोण आवडत असेल आणि त्याला डेटवर जाण्यासाठी विचारायचे असेल तर त्यांना गुलाबी रंगाचा डेटी गिफ्ट द्या. या रंगाच्या टेडी दिल्याने डेटवर जाण्यासाठी नकार देणार नाही.

बाजारात विविध प्रकारचे टेडी उपलब्ध असतात

तुम्हाला टेडी डे स्पेशल बनवण्ंयासाठी बाजार विविध प्रकारचे टेडी उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमच्या पार्टनरला आकर्षक डेटी खरेदी करुन गिफ्ट देऊ शकता.

खरतरं मुलींना टेडी बेअर खुप आवडतात. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही प्रिय व्यक्तीला टेडी गिफ्ट दिलात तर उत्तर नक्कीच 'हो' मिळेल.