
Teachers' Day 2022 HD Images: दरवर्षी सप्टेंबर रोजी देशभरात शिक्षक दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे कारण हे देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस आहे. हा दिवस सर्व शिक्षक आणि गुरूंसाठी खास आहे. यादरम्यान देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भारतात 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो, तर परदेशात 5 ऑक्टोबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो.
शिक्षक दिनानिमित्त HD Images Wishes, Wallpaper, WhatsApp status, Messages, च्या माध्यमातून आपल्या गुरुजनांना खास मराठी शुभेच्छा द्या. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Teacher's Day 2022: शिक्षक दिन कधी आहे? हा दिवस का साजरा केला जातो? त्यामागचा इतिहास काय आहे? वाचा सविस्तर)
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

हॅप्पी टीचर डे!

माझ्या आयुष्यातील सर्व गुरूंना
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडू ची अक्षरे उमटवत,
हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना...
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्व शिक्षकांना शतशा वंदन
आणि शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

शिक्षक दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी झाला. ते एक महान विद्वान तसेच तत्त्वज्ञ होते. डॉ. राधाकृष्णन यांनी आपल्या आयुष्यातील 40 वर्षे शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसोबत घालवली. डॉ. राधाकृष्णन यांनी भारतीय शिक्षणात सुधारणा आणि विकास करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ते देशाचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती राहिले आहेत. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो.