![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/09/1-1-380x214.jpg)
Happy Teacher's Day 2020 Messages In Marathi: भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिवस (5 सप्टेंबर) 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये 'शिक्षकाचे' अनन्य साधारण महत्त्व असते. शिक्षकांना भावी पिढीचा शिल्पकार समजले जाते. शिक्षकाकडून प्रत्येक विद्यार्थ्यांला जगाकडे पाहण्याची नवा दृष्टीकोण मिळतो.
आई-वडिलांनंतर शिक्षक हे प्रत्येकाचा तिसरे गुरू असतात. भारतात प्राचीन काळापासून गुरु- शिष्य परंपरा आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म-दिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. शिक्षक दिनानिमित्त मराठी Quotes, Images, Whatsapp Status वर शेअर करुन आपल्या शिक्षकांना खास शुभेच्छा नक्की द्या. (हेही वाचा - Teachers Day 2020 Messages: शिक्षक दिनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, HD Images, Quotes शेअर करून शिक्षकांप्रती व्यक्त करा आदरभाव!)
गुरूने दिला ज्ञानरुपी वसा,
आम्ही चालवू हा पुढे वारसा
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/09/2-1.jpg)
जेव्हा देशात निस्वार्थी निरपेक्ष व सेवावृत्तीने कोणतेही कार्य होते
तेव्हा त्या देशातील शिक्षकच खरे सन्मानपात्र असतात.
- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/09/05-1-1.jpg)
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/09/1-1.jpg)
विद्येविना मती गेली.. मती विना नीती गेली
नीतिविना गती गेली .. गती विना वित्त गेले
वित्ताविना सारे खचले.. इतके अनर्थ एका अविद्यने केले
या अविद्येचा काळोख हटवून विद्यारूपी प्रकाश देणाऱ्या.. सर्व शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/09/02-1.jpg)
उज्ज्वल महाराष्ट्र घडवणाऱ्या
सर्व गुरूजनांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/09/3-1-1.jpg)
शि.. शीलवान
क्ष.. क्षमाशील
क.. कर्तव्यनिष्ठ
हे गुण विद्यार्थ्याला देऊ करणारा दुवा म्हणेज शिक्षक
अशा सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/09/01-1-1.jpg)
संघर्षाकडून यशाकडे नेणाऱ्या ज्ञानाच्या प्रवासात,
मार्गदर्शक व सोबती म्हणून कष्ट घेणाऱ्या शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा !
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/09/04-1-1.jpg)
शिक्षक दिनाच्या दिवशी अनेक शाळा आणि कॉलेजमध्ये विविध कार्यक्रम उत्सव तसेच शिक्षकांप्रती आभार व्यक्त करणे किंवा आपले मनोगत व्यक्त करणे, अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याशिवाय काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचेदेखील आयोजिन केले जाते. या दिवशी विद्यार्थी शिक्षकांना पुष्पगुच्छ, भेटवस्तू, ग्रीटिंग देऊन सन्मान करतात.