
Happy Teacher's Day 2020 Messages in Marathi: 5 सप्टेंबर रोजी भारतात शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr. Sarvepalli Radhakrishnan) यांची जयंती असते. त्यांच्या जयंती दिवशी शिक्षक दिन (Teacher's Day) साजरा करण्याचा प्रथा भारतात आहे. डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी झाला होता. स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षक होते. त्यांनी भारतातील आणि आंतरराष्ट्रीय महाविद्यालयांमध्ये प्राचार्य म्हणून काम केले होते. त्यांच्या सन्मानार्थ 1962 पासून त्यांच्या जयंती दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षण दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा कोरोनाच्या सावटामुळे शाळा-महाविद्यालये अद्याप सुरु करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे यंदा व्हर्च्युअली शिक्षक दिन साजरा करावा लागणार आहे. (शिक्षक दिनी लाडक्या शिक्षकांना सरप्राईज देण्यासाठी अशा पद्धतीने घरच्या घरी बनवा ग्रिटिंग कार्ड्स!)
तसंच तुमच्या आयुष्यात अमुल्य योगदान देणाऱ्या शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी तुम्ही सोशल मीडियाच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅपवरुन संदेश, शुभेच्छापत्रं पाठवून शिक्षकांचा दिवस खास करु शकता. त्यासाठी खास मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Quotes, HD Images आणि Wallpapers.
शिक्षक दिन शुभेच्छा! ('Happy Teacher's Day Quotes) गुरुने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हां पुढे वारसा
शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

आपल्यामुळेच आम्ही घडलो
शिक्षण दिनानिमित्त
आपणांस वंदन आणि शुभेच्छा!

शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम आहे
शिक्षण हाच विकासाचा खरा मंत्र आहे
यात शिक्षकांची भूमिका मोलाची आहे.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

शिकवता शिकवता आपणास
आकाशाला गवसणी
घालण्याचे सामर्थ्य देणारे
आदाराचे स्थान म्हणजे आपले
शिक्षक!
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

संघर्षाकडून यशाकडे नेणाऱ्या ज्ञानाच्या प्रवासात,
मार्गदर्शक व सोबती म्हणून कष्ट घेणाऱ्या शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!

यंदा शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना भेटणे शक्य नसले तरी हे शुभेच्छा संदेश पाठवून तुम्ही शिक्षकांचा दिवस खास करु शकता. त्यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त करु शकता. वर्षभर आपल्या प्रगतीसाठी झटणाऱ्या, मार्ग दाखवणाऱ्या शिक्षकांप्रती भावना व्यक्त करण्याची शिक्षक दिनाची संधी अजिबात दवडू नका. तुम्हा सर्वांना लेटेस्टली मराठी कडून शिक्षक दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!