चित्ररथ । Twitter

भारताच्या प्रजासत्ताक दिनी (Republic Day) राजपथावर (Rajpath) परेड पाहण्यासाठी भारतीयांची खास उपस्थिती असते. यंदा या संचलनात महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठाचा चित्ररथ सहभाग घेणार आहे. साडेतीन शक्तीपीठासोबतच स्त्रीशक्तीचा जागर देखील दाखवला जाणार आहे. महाराष्ट्राती आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. या साडेतीन शक्तिपीठांमध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. त्यामुळे या देवींचे भव्य आणि सुंदर प्रतिमा सोबतच त्यांच्या माध्यमातून स्त्री सामर्थ्याचे दर्शन दाखवलं जाणार आहे. नक्की वाचा: कोल्हापूरची अंबाबाई , माहूरची रेणुकादेवी, सप्तशृंगी आणि तुळजापूरची तुळजाभवानी; महाराष्ट्रातील या साडेतीन शक्तिपीठांचा इतिहास आहे खास, जाणून घ्या.

तुषार प्रधान आणि रोशन इंगोले या युवक मूर्तिकार आणि कलादिग्दर्शकाकडून या साडेतीन शक्तीपीठांसाठी काम करत आहेत. त्यांच्यासोबत ‘शुभ एड’ चे संचालक नरेश चरडे आणि पंकज इंगळे हे भव्य प्रतिकृतीचे काम सांभाळत आहेत. त्यांच्यासोबत 30 जणांची टीम काम करत आहे.

पहा झलक

यंदा भारताच्या 74व्या प्रजासत्ताक दिनी Arab Republic of Egypt चे राष्ट्राध्यक्ष Abdel Fattah Al Sisi मुख्य अतिथी असणार आहेत. राजपथावर पुन्हा पूर्वीप्रमाणे दिमाखदार अंदाजात आणि लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. त्याचं बुकिंग देखील ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध करण्यात आले आहे. तर 26 जानेवारीला सकाळी डीडी चॅनेलवर लाईव्ह प्रक्षेपण पाहता येणार आहे.