भारताच्या इतिहासात अनेक विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले, यातील एक महत्वाचे नाव म्हणजे स्वामी विवेकानंद. अनेकांना ठाऊक नसेल मात्र स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) हे त्यांचे लोकांनी दिलेले नाव असून त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ (Narendranath) असे होते. कोलकाता (Kolkata) शहरात 12 जानेवारी 1863 साली त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून वृत्तीने श्रद्धाळू आणि कृतीने बेधडक असे समीकरण असणाऱ्या विवेकानंद यांच्यावर स्वधर्म, स्वभाषा यांचा भारी प्रभाव होता. परदेशातंही त्यांनी धर्म प्रसार करण्याचे काम केले. या कामाचे मोठे उदाहरण म्हणजे शिकागो (Chicago) येथे त्यांनी धर्मपरिषदेत दिलेले भाषण. माझ्या बंधू आणि भगिनींनो असे म्हणत स्वामी विवेकांनदानी दिलेला आवाज हा सातासमुद्रातील जनतेच्या काळजाला हात घालून गेला होता, आणि हेच त्यांचे सामर्थ्य होते. आपल्या विचारातून आणि बोलण्यातून त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली होती. आजही त्यांचे अनेक विचार हे तुम्हाला सहज आयुष्याकडे बघण्याचा सकारत्मक दृष्टिकोन देऊ शकतात. आज त्यांच्या जयंती निमित्त आपण हे विचार पाहणार आहोत...
स्वामी विवेकांनद यांचे प्रेरणादायी विचार
अस्तित्वात या! जागृत व्हा! ध्येय गाठल्याशिवाय थांबू नका
-स्वामी विवेकानंद
स्वतःच्या अज्ञानाची जाणीव ही ज्ञानाची पहिली पायरी आहे
- स्वामी विवेकानंद
व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर त्यास अर्थ नाही कारण;
सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात फरक आहे
- स्वामी विवेकानंद
गती आणि वाढ हीच जीवंतपणाची लक्षणं आहेत, म्ह्णूनच स्वतःचा विकास करत राहा
-स्वामी विवेकांनद
आयुष्यात जोखीम स्वीकारा; जिंकलात तर नेतृत्व कराल हरलात तर मार्गदर्शन
-स्वामी विवेकांनद
स्वतःला घडवण्यात इतके लक्ष द्या की दुसऱ्याचे दोष काढायला तुम्हाला वेळ मिळणार नाही
- स्वामी विवेकानंद
आज स्वामी विवेकानंद यांची यंदा 157 वी जयंती आहे. याच निमित्ताने आपण हे विचार पाहिलेत, यातील काही जरी आपण आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात अवलंबण्याचे ठरवले तरी तुम्हाला स्वतःत बदल जाणवून येईल. आजच्या या खास दिवशी विवेकानंद यांच्या स्मृतीस लेटेस्टली परिवाराकडून मनःपूर्वक अभिवादन!