Swami Vivekananda Death Anniversary 2020: वयाच्या 39 वर्षी 31 गंभीर आजारांनी ग्रस्त होते स्वामी विवेकानंद; आयुष्याच्या शेवटच्या दिवशी केलं होतं 'हे' विधान
Swami Vivekananda (PC - Wikimedia Commons)

Swami Vivekananda Death Anniversary 2020: स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) हे भारतीय हिंदू विचारवंत होते. ‘योग’, ‘राजयोग’ आणि ‘ज्ञान योग’ असे ग्रंथ तयार करून त्यांनी जगातील तरुणांना एक नवीन मार्ग दिला. स्वामी विवेकानंद अशा विचारसरणीचे व्यक्तिमत्त्व होते. ज्यांनी अध्यात्मिक, धार्मिक ज्ञानाच्या बळावर आपल्या दृष्टीद्वारे सर्व मानवी जगताला जीवन जगण्याची पद्धती शिकवली. आजही स्वामी विवेकानंद करोडो भारतीय तरुणांचे प्रेरणास्थान आहेत. स्वामी विवेकानंदाचा जन्म 12 जानेवारी 1863 ला झाला. स्वामी विवेकानंद यांच्या कार्यासंदर्भात सर्वांना माहिती आहे. परंतु, स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू कसा झाला? हे मात्र खूप कमी जणांना माहिती आहे. त्यामुळे या लेखामधून आपण स्वामी विवेकानंदांच्या मृत्यू विषयी काही खास रहस्यमय गोष्टी जाणून घेऊयात.

स्वामी विवेकानंद हे तरुणपणी रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते. त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापनादेखील केली होती. भारत सरकारतर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा 'युवक दिन' म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंदांच्या आई आणि वडिलांच्या चांगल्या मूल्यांमुळे आणि त्यांच्या पालनपोषणामुळे त्यांच्या जीवनाला चांगला आकार मिळाला. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंस यांना आपले गुरू मानले होते. स्वामी विवेकानंदांनी वयाच्या पंचविसाव्या वर्षीच भगवी वस्त्र परिधान करत भारत भ्रमणाला सुरुवात केली होती. (हेही वाचा - Maharashtra Bendur Rangoli Designs: महाराष्ट्र बेंदूर सणानिमित्त सुरेख रांगोळी काढून या दिवसाची करा मंगलमयी सुरुवात, Watch Videos)

स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू 4 जुलै 1902 मध्ये झाला. मृत्यूपूर्वी स्वामी विवेकानंद यांना जवळपास 31 हुन अधिक आजार जडले होते. या आजारांमुळे त्यांना निद्रानाशाचादेखील त्रास होतो. अंतिम दिवशी त्यांनी सर्व शिष्यांना एकत्र बोलावून 'भारताला नवीन विवेकानंदाची गरज आहे,' असं म्हटलं होतं. (हेही वाचा - Maharashtra Bendur 2020 Messages: महाराष्ट्र बेंदूर सणा निमित्त मराठी शुभेच्छा, Wishes, Whatsapp Status शेअर करून व्यक्त करा बैलांप्रती कृतज्ञता)

ज्या दिवशी स्वामी विवेकानंद यांच्या मृत्यू झाला, त्यादिवशी त्यांच्या दिनक्रमामध्ये कोणताही बदल घडून आला नव्हता. ते नित्याप्रमाणे त्यादिवशीदेखील दोन ते तीन तास ध्यान करत बसले होते. त्यानंतर काही वेळातचं त्यांचा मृत्यू झाला होता. स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या मृत्यूसंदर्भात अगोदरचं भविष्यवाणी केली होती. त्यात त्यांनी ते वयाच्या चाळीसाव्या वर्षांपर्यंतचं जिवंत राहतील, असं म्हटलं होतं. अखेर त्यांची ती भविष्यवाणी खरी ठरली.