Bendur Simple Rangoli Designs: देशभरातील तमाम लोकांची भूक भागविणा-या अन्नदात्या बळीराजाचा सच्चा सवंगडी म्हणजे 'बैल'. शेतीसाठी बळीराजाच्या महत्त्वाचा समजल्या जाणा-या या बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात बेंदूर (Bendur) हा सण साजरा केला जातो. यंदा हा सण 4 जुलै रोजी साजरा केला जाणार आहे. या सणानिमित्त बळीराजा आपल्या या सवंगड्याला छान सजवतो. त्याला खाऊ घालतो. त्याची पूजा करतो. शेतात धान्य पिकविण्यासाठी शेतक-याइतकीच त्याची भूमिका मोलाची असते. अशा या सणावर यंदा कोरोनाचे सावट असले तरी आपण घरातल्या घरात छान साग्रसंगीत हा सण साजरा करु शकतो.
या सणादिवशी दारात छान रांगोळी काढून, दिव्यांची आरास करुन, घरात पंचपक्वानं बनवून हा सणा साजरा करू शकता. आपल्या दाराबाहेर छान रांगोळी काढण्यासाठी काही छान डिझाईन्स:
मोराची सुरेख रांगोळी
M
बेंदूर रांगोळी
रांगोळी:
बेंदूर हा सण मध्य आणि दक्षिण भारतातील कर्नाटक (Karnatak), छत्तीसगड (Chhattisgarh), महाराष्ट्र (Maharashtra) आणि मध्य प्रदेश (Madhya Pradesh) या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. बेंदूर सणाला अनेक ठिकाणी बैलपोळा (Bail Pola) असंही म्हटलं जाते.