मोहरम ( छायाचित्र सौजन्य - pexels.com )

इस्लामचा पहिला महिना म्हणजे मोहरम. या महिन्यापासून मुस्लीम बांधवांचे वर्षारंभ होतो. रमजाननंतर मोहरम हा अत्यंत पवित्र महिन्यांपैकी एक मानला जातो. वर्षाची सुरूवात असली तरीही मोहरम हा सण किंवा उत्सवाच्या स्वरूपात साजरा केला जात नाही.

मोहरमचं महत्त्व

मोहम्मद पैगंबराच्या मृत्यूनंतर काही  वाद  झाले. मुस्लीम बांधव शिय्या आणि सुन्नी अशा दोन समुदयांमध्ये विभागले गेले. शिय्या मुसलमान मोहरमचे पहिले दहा दिवस दु:ख (मातम) म्हणून घालवतात तर सुन्नी मुसलमान 9, 10, 11 व्या दिवशी रोजा ठेवतात.

सुरूवातीच्या काळात मोहरम हा महिना युद्ध, रक्तपात अशा हिंसक गोष्टींसाठी निषिद्ध मानला जात असे. मात्र इमाम हुसेन यांची या महिन्यात हत्या झाली. त्यानंतर तो अशुभ महिना मानला जाऊ लागला.

थंड पाण्याच्या माठाची सोय

7 व्या शतकात हजरत पैगंबर नबींच्या नातवांचे म्हणजेच हसन आणि हुसेन यांचा वधही याच महिन्यात झाला. हुसेन यांच्या हत्याकांडानंतर त्यांच्या नातेवाईकांना पाणीही मिळणार नाही अशी सोय करण्यात आली होती. म्हणून या महिन्यात जागोजागी थंड पाण्याच्या माठाची सोय केली जाते. शेवटच्या दिवशी ताबूत मिरवणूक काढली जाते.

शिय्या मुसलमान या काळात छाती बडवून, छातीवर धारदार हत्यारांचा वापर करून जखमा केल्या जातात. जखमा, दु:ख समजून घेण्याचा हा काळ असतो.

सांगलीत ताबूतची प्रथा

सांगलीमध्ये कडेगाव येथे ताबुताची प्रथा आहे. या गावात मोहरम दिवशी उंच ताबूत बनवले जातात. या ताबुतांची मिरवणूक काढली जाते.  मुंबईमध्ये 'शाम ए गरीबा' मोहरम मिरवणुकीदरम्यान वाहतूक मार्गात बदल