
Shree Swami Samarth Punyatithi 2024 HD Images: यंदा श्री स्वामी समर्थांचा १४६ वा पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरा होत आहे. आज, ०६ एप्रिल रोजी पुण्यतिथी महोत्सवाचा मुख्य दिवस असून यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. श्री स्वामी समर्थ जवळपास 22 वर्षे अक्कलकोट येथे वास्तव्यास होते. स्वामी समर्थांनी 1878 मध्ये समाधी घेतली. त्यांच्या शिकवणीचे महाराष्ट्रातील लाखो लोक अनुसरण करत आहेत. अक्कलकोटमधील त्यांचा आश्रम हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.
आज स्वामी समर्थांची पुण्यतिथी साजरी होत आहे. श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त तुम्ही आपल्या मित्र-परिवारास निमित्त HD Images, Wallpapers, Whatsapp Status शेअर करून स्वामींना त्रिवार अभिवादन करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.





स्वामी समर्थ हे एक शक्तिशाली गुरु होते. ज्यांनी शंकर महाराज, गजानन महाराज, जंगली महाराज इत्यादींसारखे शक्तिशाली शिष्य निर्माण केले. त्यांनी मुस्लिम, ख्रिश्चन आणि पारशी सर्व धर्माच्या लोकांना सारखी वागणूक दिली. तसेच गरीब, गरजू आणि समाजातील सर्वात खालच्या स्तरावरील लोकांवर त्यांनी नेहमीच दया दाखवली. बरेच लोक स्वामी समर्थांना भगवान दत्तात्रेयांचा अवतार मानतात.