आषाढ अमावस्येनंतर श्रावण महिन्याची (Shravan Month) सुरूवात होते. श्रावण महीना हा हिंदू धर्मात पवित्र महीना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात अनेक व्रतवैकल्य केले जातात. खास करुन श्रावणी सोमवार च्या दिवशी शिव पुजेला खुप महत्त्व असते.या दिवशी अनेक महिला उपवास करतात. या दिवशी अनेक महत्वाची कामांची सुरुवात ही केली जाते. बऱ्याच घरात पूजा ही केली जाते. आपल्याकडे कोणत्या ही शुभ दिवशी दारापुढे रांगोळी काढणे शुभ मानले जाते. श्रावणी सोमवारचा दिवस ही खुप शुभ मानला जातो त्यामुळे अनेक महिला या दिवशी दारापुढे रांगोळी काढतात. (Shravan Month 2021 in Maharashtra: महाराष्ट्रात श्रावणमासारंभ 9 ऑगस्ट पासून; श्रावणी सोमवार ते पोळा जाणून घ्या या पवित्र महिन्यातील सण, व्रतांच्या तारखा)
यंदा 9 ऑगस्ट 2021 पासून श्रावण महिन्याला (Shravan Maas) सुरूवात होत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास श्रावण सोमवारी दारापुढे किंवा देवासमोर काढता येतील अशा सुंदर आणि सोप्या रांगोळी डिझाईन्स.
श्रावण सोमवार स्पेशल रांगोळी
श्रावण मास स्पेशल रांगोळी
श्रावण स्पेशल दिव्याभोवती काढायला दोन बोटांची रांगोळी
श्रावण मास स्पेशल रांगोळी
श्रावण सोमवार रांगोळी
हिंदू धर्मीयांसाठी श्रावण महिना हा पवित्र महिन्यांपैकी एक आहे. या महिन्यात सण, व्रत समारंभांची रेलचेल असल्याने एकूण सारीकडे उत्साहाचे, जल्लोषाचे, आनंदाचे वातावरण असते.